शेवगाव तालुक्यात भाजप कार्यकर्त्यांचा घंटानाद

शेवगाव तालुक्यात भाजप कार्यकर्त्यांचा घंटानाद

शेवगाव |तालुका प्रतिनिधी| Shevgav

राज्यात संपूर्ण व्यवहार सुरळीत चालू झाले असताना देवस्थाने बंद ठेवू नयेत. देवस्थाने बंद असल्यामुळे येथे अवलंबून असलेले छोटे-मोठे दुकानदार व्यावयायिक,

फुले उत्पादन करणारे शेतकरी आदी लोक बेरोजगार झाली आहेत. त्याचप्रमाणे भाविकांच्या भावनांचा सन्मान करून महाराष्ट्रातील देवस्थाने सुरूळीत सुरू करावेत याकरिता विविध संघटनांनी ‘दार उघड उद्धवा दार उघड’ अशी हाक देत घंटानाद आंदोलन आयोजित केले होते.

आ. मोनिकाताई राजळे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात जगदंबा देवी, भाविनिमगाव, पावन गणपती मंदिर शेवगाव तसेच बोधेश्वर मंदिर बोधेगाव आदी ठिकाणी घंटानाद आंदोलन करण्यात आले.

यावेळी धुळेचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांना निवेदन देण्यासाठी गेलेल्या भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी अमानुषपणे मारहाण केली, विद्यार्थ्यांंना मारहाण होत असताना मंत्री बघ्याची भूमिका घेत निघून गेले. त्यांच्या या कृतीचा निषेधही भाजपने यावेळी केला.

केंद्र शासनाने देवस्थाने सुरू करणेबाबत यापूर्वी परिपत्रक पारीत केले असून प्रमुख देवस्थाने सुरू झाली आहेत. करोनाचे नियम पाळून महाराष्ट्रातील देवस्थाने सुरू करण्यासाठी भाविकांनी तसेच विविध संघटनांनी वेळोवेळी मागणी करून सुद्धा आघाडी सरकारने भाविकांच्या मागणीचा विचार न करता देवस्थाने बंद ठेवली आहेत.

देवस्थाने सुरू होण्यासाठी भाजप तालुकाध्यक्ष ताराचंद लोंढे, रवींद्र सुरवसे, सचिन वारकड, आशाताई गरड, भीमराज सागडे, अशोक आहुजा, सुनील रसाने, वाय. डी. कोल्हे, कचरू चोथे, राजेंद्र डमाळे, उदय शिंदे, संदीप खरड, संदीप देशमुख, कासम शेख, शरद चाबुकस्वार, बंडूशेठ मेहेर, जगदीश धूत, सागर फडके, संतोष कंगणकर, अमोल घोलप, राहुल बंब, विठ्ठल बिडे, रामहरी घुले, सुभाष बरबडे, विजय नजन, मुसाभाई शेख, सुरेश थोरात, गुरुनाथ माळवदे, लक्ष्मण काशीद, पवार महाराज, बशीर पठाण, दिगंबर टोके, राजेंद्र घनवट, अजय डमाळ, काका हरदास, सुभाष वाघमारे गोकुळ निकम आदी मान्यवरांनी आंदोलनात सहभाग घेतला.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com