शेवगाव ते पंढरपूर सायकल वारी

 शेवगाव ते पंढरपूर सायकल वारी

शेवगाव (तालुका प्रतिनिधी) / shevgaon - येथील 13 तरुणांनी शेवगाव ते पंढरपूर असा 230 किलोमिटर अंतराचा प्रवास सायकलवर पार करत अनोखी पंढरपूर वारी पूर्ण केली.

शेवगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवरायांचे पूजन करून सायकलस्वारांनी शनिवारी (दि. 10) पहाटे पाच वाजता पंढरपूरकडे प्रस्थान केले. पाथर्डी मार्गेकडा, मिरजगाव, करमाळा असे सुमारे 185 किलोमीटर अंतर पार करून सायकलस्वारांनी सायंकाळी 7 वाजता टेंभुर्णी येथे पहिला मुक्काम केला. त्यानंतर रविवारी (दि. 11) पहाटे पाच वाजता टेंभूर्णीहून निघून 45 किलोमीटरचे अंतर सायकल प्रवास करीत पंढरपूर येथे विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतले.

या सायकल वारीत सामाजिक कार्यकर्ते विनोद ठाणगे, सुनील गवळी, दीपक वैद्य, डॉ. योगेश फुंदे, डॉ. संदीप बोडखे, डॉ. श्रीकांत देवढे, इनरव्हीलच्या अध्यक्षा डॉ. मनीषा लड्डा, निलेश केवळ, दुर्गेश काथवटे, हरिश शिंदे, सचिन मुळे, पाथर्डीचे सायकलप्रेमी सुभाष पवार, अनिल बंग (चाळीसगाव) हे सहभागी झाले होते.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com