शेवगावच्या व्यक्तीची पुण्यात लॉजमध्ये आत्महत्या
सार्वमत

शेवगावच्या व्यक्तीची पुण्यात लॉजमध्ये आत्महत्या

मृतदेह शवविच्छेदनासाठी ससूनला

Dhananjay Shinde

Dhananjay Shinde

पुणे (प्रतिनिधी) - पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील वडगाव बुद्रुक परिसरातील श्रीराम लॉजमध्ये एकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे. नंदू बेबी अंधारे (वय 39, रा. शेवगाव जि. अहमदनगर) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

सिंहगड रस्ता पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नंदू अंधारे हे शेवगाव येथून सिंहगड रस्ता परिसरातील श्रीराम लॉज येथे 10 जुलैपासून राहावयास आले होते. त्यांनी लॉज मालकाला ते कंपनीच्या कामानिमित्त पुण्यात आल्याचे सांगितले. सोमवारी रात्री ते जेवण करून रुममध्ये आराम करण्यासाठी गेले होते. मंगळवारी सकाळी साफसफाई करणार्‍या मुलाने त्यांच्या रूमचा दरवाजा बर्‍याच वेळ ठोठावला परंतु आतून काही आवाज अथवा प्रतिसाद त्याला मिळाला नाही.

दरम्यान लॉज चालकाने खिडकीतून डोकावले असता त्यांना अंधारे यांनी पंख्याला डोरो बांधून गळफास घेतल्याचे आढळून आले. याबाबत त्यांनी तत्काळ सिंहगड रस्ता पोलिसांना माहिती दिली. अग्निशमन दलाच्या जवानांनी दरवाजा तोडून मृतदेह बाहेर काढला. मृतदेह शवविच्छेदनासाठी ससूनला पाठविण्यात आला आहे.पुढील तपास सिंहगड रस्ता पोलीस करीत आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com