शेवगावला नगरपरिषद कामगारांचे आंदोलन

सेवाज्येष्ठता यादी सुधारणेसह विविध मागण्या
शेवगावला नगरपरिषद कामगारांचे आंदोलन

शेवगाव |शहर प्रतिनिधी| Shevgav

नगरपरिषद कामगारांच्या विविध महत्त्वपूर्ण मागण्यांच्या पाठपुराव्यासाठी कामगार संघटना, वंचित बहुजन आघाडी नेतृत्वात आज घंटानाद आंदोलन करण्यात आले.

शहरातील आंबेडकर चौकातील महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर तसेच शिवाजी चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून कामगारांचा हा मोर्चा पैठण रस्त्यावरील क्रीडा संकुल नजीकच्या नगरपरिषदेच्या कार्यालयावर नेण्यात आला.

सेवाज्येष्ठता यादी, रिक्त पदे भरताना सेवाज्येष्ठता यादीस प्राधान्य, भविष्य निर्वाह निधी, थकीत वेतन तातडीने मिळावे आदी मागण्या असल्याचे कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष रमेश खरात यांनी सांगितले. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष प्रा.किसन चव्हाण, तालुकाध्यक्ष प्यारेलाल शेख कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष रमेश खरात, वशाल इंगळे, सागर हवाले, महेश धायतडक, राजु शेख, सलीम शेख, अन्सार कुरेशी आदी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com