शेवगाव नगरपारिषदेचा संख्या निश्चिती प्रस्ताव सादर

नगरसेवकांची संख्या 21 वरून 24 होणार
शेवगाव नगरपारिषदेचा संख्या निश्चिती प्रस्ताव सादर

शेवगाव |प्रतिनिधी| Shevgav

आगामी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेवगाव नगरपरिषदेने संख्या निश्चितीचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे पाठविल्याची माहिती प्रभारी मुख्याधिकारी संतोष लांडगे यांनी दिली.

शेवगाव नगरपरिषदेची निवडणुक मुदत 7 फेब्रुवारी 2020 रोजी संपुष्टात आली असून त्यानंतर नगरपरिषदेवर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या सुचनेनुसार मागील वर्षी नोव्हेंबर व डिसेंबर या कालवधीत प्रभाग रचना व आरक्षण प्रक्रिया पार पडली होती. मात्र करोना महामारीमुळे नगरपरिषदेची निवडणूक लांबणीवर टाकण्यात आली. प्रभारी मुख्याधिकारी लांडगे यांनी सांगितले की, 2011 च्या जनगणनेनुसार शेवगाव शहराची लोकसंख्या 38 हजार 375 असल्याने व त्यानंतर करोनामुळे 2021 ची जनगणना रखडली आहे.

2011 च्या जनगणनेनंतर वाढलेली लोकसंख्या गृहीत धरून राज्य सरकारने नगरसेवकांची संख्या वाढविण्याचा निर्णय घेतला असून सदस्य संख्या निश्चितेचे अधिकार विभागीय आयुक्तांना दिले आहेत. त्यामुळे सरकारच्या निर्देशानुसार वाढलेली लोकसंख्या गृहीत धरून 21 ऐवजी 24 जागांचा प्रस्ताव मंजुरीकरिता नुकताच पाठविण्यात आला आहे. त्यामुळे शेवगाव नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी नव्याने निवडणूक पूर्व प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याने नगरसेवकांची संख्या निश्चितीनंतर नव्याने प्रभाग रचना, आरक्षण, मतदार यादी आदी सर्व प्रक्रिया पुन्हा नव्याने राबविली जाणार आहे. त्यानंतर निवडणूक कार्यक्रम जाहीर केला जाणार आहे.

इच्छुकांच्या आशेवर पाणी

शेवगाव नगरपरिषदेची निवडणूक नव्या वर्षात 2022 मध्ये होईल असा अंदाज व्यक्त होत असल्याने इच्छुकांच्या आशेवर पाणी फिरून त्यांचा जीव पुन्हा टांगणीला लागला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com