शेवगाव (तालुका प्रतिनिधी) -

शेवगाव तालुक्यात 48 ग्रामपंचायतीच्या 15 जानेवारी रोजी होणार्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सदस्यपदाच्या

एकुण 408 जागेसाठी 1 हजार 332 अर्ज दाखल झाले होते. 1 हजार 332 अर्जापैकी छाननीत 37 अर्ज अवैध तर 1 हजार 295 अर्ज वैध ठरले अशी माहिती निवडणुक निर्णय अधिकारी तथा तहसिलदार अर्चना पागिरे यांनी दिली.

गुरुवार (दि. 31) छाननी केल्यांनंतर जात पडताळणी पावती नसणे, फॉर्म अपूर्ण भरलेला असणे, बँक पासबुक नसणे, शौचालय दाखला नसणे या इतर कारणांमुळे 37 अर्ज अवैध तर 1 हजार 295 अर्ज वैध ठरले. त्यामध्ये सर्वाधिक चापडगाव-6, कोनोशी-6, वाडगाव-5, हातगाव-3 व ढोरजळगाव ने-3, आखतवाडे- 1, बोडखे 1, तळणी 1, दादेगाव 1, गदेवाडी 2, सोनेसांगवी 2, पिंगेवाडी 1, राणेगाव 2, ठा. पिंपळगाव 1, सुलतानपुर बु. 1, वरखेड 1 असे अर्ज अवैध झाले.

पहिल्या टप्प्यातच बाहेर पडण्याची वेळ आलेल्या इच्छुक उमेदवारांचा उत्साह मावळत्या वर्षाअखेरीस मावळला. आता उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दि. 4 जानेवारीनंतर निवडणुकीच्या रिंगणात उरलेल्या उमेदवारांवरुन निवडणुकीचे खरे चित्र स्पष्ट होईल.