शेनवडगाव सोसायटी निवडणुकीत दुरंगी लढत

शेनवडगाव सोसायटी निवडणुकीत दुरंगी लढत

आरडगाव |वार्ताहर| Aradgav

राहुरी तालुक्यातील शेनवडगांव विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत बजरंग शेतकरी मंडळ व जनसेवा परिवर्तन मंडळात दुरंगी लढत होत आहे. त्यामुळे ही निवडणूक चांगलीच रंगतदार होणार असल्याचे दिसून येत आहे.

दि.12 जून रोजी होत असलेल्या पंचवार्षिक निवडणुकीत 12 जागेसाठी बजरंग शेतकरी मंडळाचे सर्वसाधारण कर्जदार प्रतिनिधी दिलीप जाधव, द्वारकानाथ जाधव, मोहन जाधव, यमराज जाधव, विलास जाधव, पांडुरंग शिंदे, शांतीलाल शिंदे, सागर शिंदे, जाती-जमाती मतदारसंघ बाळासाहेब वंजारी, महिला प्रतिनिधी मुक्ताबाई जाधव, मंदाबाई जाधव, इतर मागास प्रवर्ग चंद्रकांत जाधव यांचा समावेश आहे.

जनसेवा परिवर्तन मंडळाचे सर्वसाधारण कर्जदार प्रतिनिधी आप्पासाहेब जाधव, कांतीलाल जाधव, किशोर जाधव, दौलत जाधव, प्रभाकर जाधव, बाळासाहेब जाधव, मच्छिंद्र जाधव, सुनील जाधव, महिला प्रतिनिधी कल्पना जाधव, कल्पना शिंदे, जाती-जमाती मतदारसंघ नामदेव वंजारी, इतर मागास प्रवर्ग किशोर जाधव हे एकूण 24 उमेदवार निवडणूक रिंगणात उभे आहेत. 283 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी एस.वाय.आगळे व सहाय्यक भगिरथ जगताप सचिव हे काम पाहणार आहेत. कोण बाजी मारणार? याकडे तालुक्याचे लक्ष वेधले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com