टेम्पोची दुचाकीला धडक; बालकाचा मृत्यू

वडिल जखमी; शेंडी बायपास येथील घटना
टेम्पोची दुचाकीला धडक; बालकाचा मृत्यू

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

टेम्पोची दुचाकीला धडक बसून झालेल्या अपघातात सात वर्षीय बालकाचा मृत्यू झाला आहे. कुणाल संतोष काळे (रा. बहिरवाडी ता. नगर) असे मयत बालकाचे नाव आहे. या अपघातात त्याचे वडिल जखमी झाले आहेत. त्यांच्यावर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नगर-औरंगाबाद रोडवरील शेंडी (ता. नगर) बायपास येथे रविवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास हा अपघात झाला.

दरम्यान शेंडी बायपास रोडवर वारंवार अपघात होतात. यामध्ये अनेकांचे बळी गेले आहेत. रविवारी झालेल्या अपघातानंतर संतप्त जमावाने रास्ता रोको आंदोलन केले. यामुळे वाहतुकीची कोंडी झाली होती. संतोष काळे हे त्यांची पत्नी व मुलासोबत त्याच्या दुचाकीवरून नगरकडून बहिरवाडीकडे जात असताना औरंगाबादकडून नगरच्या दिशेने येणार्‍या आयशर टेम्पोने संतोष यांच्या दुचाकीला शेंडी बायपास येथे धडक दिली.

यात कुणाल जागीच ठार झाला तर संतोष काळे जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने उपचारासाठी येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान अपघाताची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज आठरे पथकासह घटनास्थळी दाखल झाले. एमआयडीसी पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com