बिबट्याच्या हल्यात मेंढरे ठार
सार्वमत

बिबट्याच्या हल्यात मेंढरे ठार

येळपणे परिसरात दहशत

Nilesh Jadhav

श्रीगोंदा | Shrigonda

तालुक्यातील राजापूरमध्ये एक बिबट्या शेतात लावलेल्या जाळयात अडकला होता. याच गावाजवळ येळपणे या गावात बिबट्याने मेंढ्यांच्या कळपावर हल्ला केला. यात एक मेंढी बिबट्याने खाल्ली तर उरलेल्या पाच ते सहा मेंढ्या जखमी केल्या असून काही मेंढ्या मरण पावल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

तरी वन विभागाने एकाच मेंढी मेल्याचा पंचनामा केला आहे. आण्णा नाना कोळपे रा. ठाणगे वाडी, येळपणे या मेंढपाळचे मेंढ्यावर रात्री बिबट्याने हल्ला केला होता. यात काही मेंढ्या मरण पावल्या आहेत.

Deshdoot Digital Dhamaka | देशदूत डिजिटल धमाका
www.deshdoot.com