मी पुन्हा येईनची दहशत आद्याप कायम

उपमुख्यमंत्री फडणवीस यांचा शरद पवारांना टोला
मी पुन्हा येईनची दहशत आद्याप कायम

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

मी पुन्हा येईन या माझ्या वाक्याची अजूनही दहशत आहे. काल त्याचा प्रत्यय आला. लोकांनी मला पुन्हा आणले होते. पण काहींनी बेईमानी केल्यामुळे मी येऊ शकलो नाही. मात्र आता मी या बेईमानांचा संपूर्ण पक्षच घेऊन आलो आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांनी शरद पवार (Sharad Pawar) व ठाकरे गटावर निशाणा साधला.

मी पुन्हा येईनची दहशत आद्याप कायम
विरोधकांना आम्ही तिघे संताजी-धनाजीसारखे दिसतो

शिर्डीत (Shirdi) गुरुवारी शासन आपल्या दारी कार्यक्रम (Shasan Aaplya Dari) झाला. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यावर केलेल्या टीकेचा समाचार घेतला. माझ्या ‘मी पुन्हा येईन’ या वाक्याची दहशत अजून पाहायला मिळते. काल राष्ट्रीय नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी फडणवीसांच्या मी पुन्हा येईन म्हणण्याचा आदर्श घेतल्याची टीका (Criticism) केली. मी पुन्हा येईन म्हणालो होतो. त्यानुसार लोकांनी पुन्हा मला आणलेही होते. पण काही लोकांनी बेईमानी केली. म्हणून मी येऊ शकलो नाही.

पण लक्षात ठेवा, ज्यांनी आमच्याशी बेईमानी केली त्यांचा पूर्ण पक्ष घेऊनच आम्ही आलो. त्यामुळे शंका ठेवण्याचे कारण नाही, असे ते पवारांवर निशाणा साधतांना म्हणाले.

मी पुन्हा येईनची दहशत आद्याप कायम
शिर्डी-नगर उमेदवारीसाठी ठाकरेंकडून आज चाचपणी

होय, आमची आहे मुख्यमंत्रीपदावर नजर...

आज राज्यात एक मजबूत सरकार आहे. पण त्यानंतरही काहीजण दिवसा स्वप्न पाहत आहेत. दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची नजर मुख्यमंत्र्याच्या खुर्चीवर आहे अशी टीका (Criticism) करत आहेत. होय, आमची नजर मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर आहे. कारण आम्हाला आमच्या मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीचे संरक्षण करायचे आहे. आमच्या मुख्यमंत्र्यांकडे वाकडी नजर करणार्‍याला त्याची जागा दाखवण्याचे काम आम्ही दोघे उपमुख्यमंत्री करू, असे फडणवीस म्हणाले.

मी पुन्हा येईनची दहशत आद्याप कायम
काकडी येथे आज शासन आपल्या दारी

आमचा जवाब नाही

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) 24 तास काम करतात. संवेदनशीलपणे काम करतात. इर्शाळवाडीत दुर्घटना घडली. तिथे प्रशासनाला पोहोचता येत नव्हते, तिथे ते पायपीट करत पोहोचले. शिंदेंच्या कामाची शैली तथा अजित पवार (Ajit Pawar) व माझं तुम्हाला माहिती आहे. आम्ही तिघे एकत्रित आल्यामुळे आता आमचा जवाब नाही, असेही ते यावेळी म्हणाले.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com