गुजरातच्या भामट्याला नगर सायबरकडून अटक; काय आहे प्रकरण?

गुजरातच्या भामट्याला नगर सायबरकडून अटक; काय आहे प्रकरण?

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

शेअर ट्रेडींगमध्ये जादा नफा करून देण्याचे अमिष दाखवून 50 लाख 63 हजार रुपयांची फसवणूक करणार्‍या आरोपीला नगरच्या सायबर पोलिसांनी गुजरातमधून जेरबंद केले. रौनककुमार रमेशभाई परमार (वय 28, रा. मेहसाना, गुजरात) असे आरोपीचे नाव आहे.

आदित्य पटेल, दिनकरभाई मेहता, गौतम शहा व रितेशभाई यांनी शेअर ट्रेंडींगमध्ये गुंतवणूक करून अधिक नफा मिळवून देतो असे सांगत अकोले तालुक्यातील एका शिक्षकाची फसवणूक केल्याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले, उपनिरिक्षक प्रतिक कोळी, हवालादार योगेश गोसावी, हवालदार उमेश खेडकर, राहुल हुसळे, नाईक दिंगबर कारखेले, मलिकार्जुन बनकर, निलेश कारखेले, पोकॉ अरूण सांगळे यांच्या पथकाने गुन्ह्याचा तपास केला.

पोलीसांनी डिजिटल व्यवहार ट्रेस करत गुजरात परिसरात तीन दिवस तपास केला. अधिक तपास केला असता या प्रकरणातील महत्वाचा आरोपी रौनककुमार परमार हा मेहसाना (गुजरात) येथे असल्याचे समोर आले. यानंतर पथकाने त्यास ताब्यात घेतल्यावर त्याने फसवणूक केल्याची कबुली दिली. अधिक तपास निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले करीत आहेत.

गुजरात, मध्यप्रदेशात टोळ्या सक्रीय

शेअर ट्रेडींगमध्ये मोठा नफा मिळून देण्याचा बहाणा करून मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक करणार्‍या टोळ्या मेहसाणा, सुरत, इंदोर अशा गुजरात व मध्य प्रदेशातील विविध जिल्ह्यात सक्रीय आहेत. त्यांनी आतापर्यंत अनेकांची फसवणूक केली आहे. त्यामुळे आमिषाला बळी पडून अनोळखी व्यक्तीबरोबर व्यवहार करू नये, असे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com