शेअर मार्केटमध्ये पैसे डबल करून देण्याचे आमिष

सावेडीतील महिलेची अडीच लाखांची फसवणूक
शेअर मार्केटमध्ये पैसे डबल करून देण्याचे आमिष

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवणूक केल्यास ते डबल करून देण्याचे आमिष दाखवून नोकरदार महिलेची दोन लाख 52 हजार 385 रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. फसवणूक झालेल्या सावेडी उपनगरातील महिलेने याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी सुरज मोढवे (रा. वाकोडी ता. नगर) याच्याविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. सावेडी उपनगरातील फिर्यादी महिला नागापूर एमआयडीसीतील एका कंपनीत नोकरीला असताना त्याच कंपनीत नोकरीला असणार्‍या मोढवे बरोबर त्यांची ओळख झाली होती. त्याने फिर्यादी यांचा विश्वास संपादन करून शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास पैसे डबल करून देण्याचे आमिष दाखविले होते.

फिर्यादी यांनी त्यांच्या झोपडी कॅन्टीन येथील टीजीएसबी सहकारी बँक खात्यातून फोन पे यूपीआयव्दारे मोढवे याच्या नंबरवर 52 हजार 385 रुपये पाठविले, तसेच फिर्यादी यांनी मोढवे याला रोख दोन लाख रुपये दिले होते. असे एकूण दोन लाख 52 हजार 385 रूपये फिर्यादी यांनी मोढवे याला दिले होते. सदरची रक्कम 15 जानेवारी, 2022 ते 20 जानेवारी, 2022 दरम्यान देण्यात आली होती.

दरम्यान मोढवे याने फिर्यादी यांच्या नावे शेअर मार्केटमध्ये कुठलीही गुंतवणूक न करता त्यांची फसवणुक केली आहे. तसेच दिलेले पैसे परत न केल्याने फिर्यादी यांनी पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास तोफखाना पोलीस करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com