शारदा पतसंस्थेच्या लॉकरमधून अडीच लाखांचे सोने लंपास

शारदा पतसंस्थेच्या लॉकरमधून अडीच लाखांचे सोने लंपास

संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner

शहरातील शारदा नागरी पतसंस्थेच्या लॉकरमधून अडीच लाख रुपयांचे सोने चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी एकाजणाविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे.

शारदा नागरी पतसंस्थेच्या सोनेतारण लॉकरचा चार्ज संदीप नामदेव गुळवे याचेकडे होता. त्याने कोणाचीही परवानगी नसताना एकट्यानेच लॉकर उघडून त्यामधील खाते क्रमांक 5001732 मधील बॅगमध्ये ठेवण्यात आलेले अडीच लाख रुपयांचे दागिने चोरून नेले. त्यामध्ये 46 ग्रॅम शुद्ध वजनाचे दागिने त्यात काळी पोत, गंठण पँडल, कान वेल, दोन अंगठी या दागिन्यांचा समावेश होता.

याबाबत व्यवस्थापक माधव भोर यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार संदीप नामदेव गुळवे (रा. कर्‍हे, ता. संगमनेर) याच्या विरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर 249/2022 भारतीय दंड संहिता 381 प्रमाणे दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक मुकंद देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल श्री. शेख करत आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com