राज्यातील मोठे प्रकल्प इतरत्र जाणे ही लाजीरवाणी गोष्ट - शरद पवार

राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंथन वेध भविष्याचा या दोन दिवसीय शिबिराचा समारोप
राज्यातील मोठे प्रकल्प इतरत्र जाणे ही लाजीरवाणी गोष्ट - शरद पवार

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

प्रधानमंत्री पदावरील व्यक्तीकडे सर्वसमावेशक विकासाची दृष्टी आणि विचारांची व्यापकता असायला हवी. परंतु दुर्दैवाने तसे सध्या दिसत नाही. राज्यातील प्रकल्प गुजरातकडे वळवण्यात आले. राज्यातील सध्याच्या सरकारच्या डोळ्यांदेखत प्रकल्प जाणे ही लाजिरवाणी गोष्ट असून टाटा एअरबसचा प्रकल्प हलवण्यापेक्षा केंद्रातील सरकारने देशाच्या संरक्षणाच्या दृष्टीने महत्त्वाचे प्रकल्प कार्यरत कसे करता येईल याकडे लक्ष द्यायला हवे होते. आज या प्रकल्पाची अवस्था बिकट आहे. विमाने तयार करण्यासाठी लागणारे तंत्रज्ञान व कुशल मनुष्यबळ उपलब्ध असताना या प्रकल्पांकडे ऑर्डर्स नाहीत, नवीन काम नाही. वायुदल शक्तिशाली करण्यासाठी रशियन तंत्रज्ञानाची मदत घेऊन लढाऊ विमाने निर्मिती करण्याचा प्रकल्प भारतातील बंगलोर, नाशिक आणि लखनऊ अशा तिन ठिकाणी प्रकल्प उभारण्यात आले. प्रधानमंत्र्यांनी या तिन्ही प्रकल्पांच्या बळकटी करण्यासाठी कष्ट घेतले असते तर मी त्यांचे स्वागत केले असते, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले.

राज्यातील मोठे प्रकल्प इतरत्र जाणे ही लाजीरवाणी गोष्ट - शरद पवार
राष्ट्रवादी काँग्रेसची स्वबळाची तयारी

शिर्डी येथे आयोजित केलेल्या राष्ट्रवादी मंथन वेध भविष्याचा या दोन दिवशीय शिबिराचा शनिवारी शरद पवार यांच्या उपस्थितीत समारोप झाला. शरद पवार मागील काही दिवसांपासून रुग्णालयात उपचार घेत आहेत. अशा स्थितीतही त्यांनी शिर्डी येथे जाऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिबिराला हजेरी लावली. यावेळी ते कार्यकर्त्यांना सविस्तरपणे संबोधित करू शकले नाहीत. त्यांनी आपलं भाषण थोडक्यात उरकलं. यावेळी केलेल्या भाषणात शरद पवार म्हणाले, मी सगळ्यांची भाषणं ऐकली नाहीत, पण काही भाषणं ऐकण्याची संधी मिळाली. सध्या मी एवढंच सांगू इच्छितो की, आज मला सविस्तर बोलणं शक्य नाही. कारण वैद्यकीय अधिकार्‍यांनी तसा सल्ला दिला आहे. आणखी 10 ते 15 दिवसांनी मला नेहमीचं काम करता येईल, असं वैद्यकीय अधिकार्‍यांनी सांगितलं आहे. पण या शिबिरातून एक संदेश जात आहे की, राष्ट्रवादीचा कार्यकर्ता पूर्ण ताकदीने हा पक्ष मजबूत करणार आहे. महाराष्ट्रात परिवर्तन घडवण्याची ताकद आणि हिंमत तुमच्यामध्ये आहे. ही संधी लवकरच मिळेल, असा विश्वासही शरद पवारांनी व्यक्त केला. एवढं बोलून शरद पवारांनी अवघ्या काही मिनिटांत आपलं भाषण आटोपतं घेतलं.

राज्यातील मोठे प्रकल्प इतरत्र जाणे ही लाजीरवाणी गोष्ट - शरद पवार
शालेय पोषण आहार योजना आता ‘पीएम-पोषण’ नावाने

यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिलीप वळसे पाटील यांनी शरद पवारांचं उर्वरित भाषण वाचून दाखवले. यावेळी पवार यांनी सांगितले की, केंद्र व राज्यातील नेतृत्वामधील धोरणात अंतर असू शकते. केंद्रातील सत्तेने त्यांचा मान राखायला हवा. आज अनेक राज्यांमध्ये केंद्रातील सत्तेच्या विचारांशी सहमत नसलेले सरकार आहे. केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा, ओडिसा, पश्चिम बंगाल, दिल्ली, पंजाब, बिहार, झारखंड, छत्तीसगड या राज्यांमध्ये भाजपाची सत्ता नाही. अगदी कर्नाटक, मध्यप्रदेश, महाराष्ट्र व गोवा या राज्यातील जनतेने देखील भाजपाला दूर ठेवले होते. परंतु केंद्रातील सत्ताधीशांनी केंद्रीय यंत्रणांचा वापर करून विधानमंडळ सदस्य फोडून या राज्यामधील सत्ता हस्तगत केली. एकंदरीत गुजरात, उत्तर प्रदेश, आसाम, हरियाणा हे राज्य वगळता देशातील जनतेने भाजपला नाकारलेले आहे. सामान्य माणसांना ईडी, सीबीआय, आयकर विभाग, केंद्रीय निवडणूक आयोग, एनसीबी वगैरे यंत्रणाची फारशी माहिती नव्हती परंतु या यंत्रणांच्या गैरवापरामुळे देशात सर्वत्र चर्चा सुरू आहे. देशाचे नेतृत्व चालवण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे. अशा घटकांनी सत्तेचा हव्यास सोडून देशाचा विचार करणे आवश्यक आहे. परंतु तसे न होता अनेक राज्याच्या नेतृत्वावर अनैतिक हल्ला केला जातो. राज्यातील सत्ता कायम राखणे व नवीन सत्ता स्थान बळकवणे हाच त्यांचा अजिंठा ठरलेला असून कोणाताही पक्षपात, राग अनुराग न बाळगता सर्व प्रकारच्या लोकांसाठी घटनेच्या व कायद्याच्या चौकटीत राहून कार्य करण्याची शपथ घेतली जाते. थोडक्यात प्रधानमंत्र्यांनी समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन सौख्य, शांती आणि प्रगतीच्या मार्गावर राष्ट्राला न्यायला हवे. प्रधानमंत्री पदावरील व्यक्तीकडे अशी सर्व सर्वसमावेशक विकासाची दृष्टी आणि विचारांची व्यापकता असायला हवी परंतु दुर्दैवाने तसे सध्या दिसत नसल्याचे पवार यांनी सांगितले.

राज्यातील मोठे प्रकल्प इतरत्र जाणे ही लाजीरवाणी गोष्ट - शरद पवार
...तर सिताराम गायकर यांना पुन्हा जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाची लॉटरी

पंतप्रधान मंत्री अटल बिहारी वाजपेयी यांनी एक सुसंस्कृत नेता असा आपला लौकिक कायम ठेवला. त्यांनी प्रशासकीय निर्णय घटनेची विशिष्ट चौकट ओलांडून घेतले नसल्याचा पवार यांनी आवर्जून उल्लेख केला.

प्रधानमंत्र्यांनी आपले अधिक लक्ष कमजोर होत असलेल्या अर्थव्यवस्थेकडे आणि प्रश्नांची सोडवणूक करण्याकडे द्यायला हवे, असे स्पष्ट करीत पवार म्हणाले, महाराष्ट्रापुरता विचार करायचा झाल्यास सध्याचे राज्यकर्ते कोठे आहेत आणि काय करताय असा प्रश्न पडतो. सध्याच्या राज्यकर्त्यांच्या अनेक प्रसंग व अनेक गोष्टीवर होणार्‍या प्रतिक्रिया पाहिल्या तर त्यांचा विचार संकुचित स्वरूपाचा आहे हे प्रकर्षाने दिसून येते. हे चित्र समाधानकारक नाही. पक्षाचे विविध पदाधिकारी कार्यकर्ते यांचे मी मनापासून कौतुक करतो या शिबिरात सहभागी झालेला प्रत्येक जण परत जाताना नवी ऊर्जा घेऊन जाईल आणि परिवर्तनाच्या कार्यामध्ये स्वतःला झोपून देईल, असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला.

राज्यातील मोठे प्रकल्प इतरत्र जाणे ही लाजीरवाणी गोष्ट - शरद पवार
प्रलंबित पिटीशनचा निर्णय होईपर्यंत साई संस्थानवर नवीन विश्वस्त नेमू नका

खा. सुप्रिया सुळे म्हणाल्या, यशवंतराव चव्हाणांनी मंगल कलश महाराष्ट्रातील मायबाप जनतेच्या कल्याणासाठी आणला होता, खोक्यांसाठी नव्हे. स्पेक्ट्रम घोटाळ्यामुळे युपीए सरकार कोसळले. युपीए सरकारने 5050 मेगा स्पेक्ट्रम विकून 9 हजार कोटी सरकारला मिळाले होते. त्यावेळी भाजपच्या म्हणण्यानुसार ते एक लाख 76 कोटी सरकारला मिळालया हवे होते. त्या आरोपावरुन सरकार पडले. आता मोदी सरकारने 5 जी मध्ये 51 हजार 230 मेगा स्पेक्ट्रम विकले. त्यातून सरकारला आलेत 1 लाख कोटी. त्यांच्या मागील हिशोबावरुन आणखी 8 लाख कोटी रुपये यायला हवे होते. मग यात भ्रष्टाचार म्हणायचा का? असा सवाल सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला.

एकनाथ खडसे म्हणाले, निवडणुका वार्‍यावर जिंकता येत नाही. अपेक्षित यश मिळवायचे असेल तर संघटना तळागाळात पोहचली पाहिजे. पदाधिकार्‍यांनी केवळ पक्षाचा आदेश म्हणून मोर्चे, आंदोलने करु नये. आंदोलन करताना सर्वांना बरोबर घेऊन पूर्ण ताकदीनिशी आंदोलन करावे. आंदोलनाचा गवा सदर यंत्रणेवर बसला पाहिजे. सद्यस्थितीत महागाईवर वर्षाचे 365 दिवस आंदोलन करु शकतो. पक्षात सुसंवाद असायला हवा. विसंवाद नको, असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले.

खा. सुनिल तटकरे म्हणाले, आपण भाग्यवान आहोत शरद पवार यांच्यासारखे नेतृत्व आपल्याला मिळाले. पवार साहेबांचा हात डोक्यावर नसल्यावर काय होते हे मधुकर पिचडांना विचारा. जोपर्यंत त्यांच्या डोक्यावर पवार साहेबांचा हात होता तोपर्यंत पिचड राज्याचे नेते होते. आज ते गल्लीतीलही नेते राहिलेले नाहीत. स्वतः स्थापन केलेल्या अगस्ती कारखान्यात त्यांना व त्यांच्या सुपुत्राला पराभवाचा सामना करावा लागला. ही ताकद राष्ट्रवादीची आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सरकार जाणीवपूर्वक पुढे ढकलत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.

छगनराव भुजबळ म्हणाले, धर्मांध सत्तेच्या विरोधात लढण्याची ताकद फुले, शाहू, आंबेडकरांकडून मिळते. त्यामुळे महाराष्ट्रात समतेचे चक्र कुणीही फिरवू शकत नाही. सध्याचे सरकार हे महागाईवरुन लक्ष विचलित करण्यासाठी जाती-जातीमध्ये विष पेरण्याचे काम करत आहे. घरात वापरल्या जाणार्‍या वस्तुंच्या किंमती दोनशे ते 300 टक्क्यांनी वाढल्या. सत्य परिस्थितीवर बोलायला लागलो की ताबडतोब इडीची काडी पेटते. त्यावर कळस म्हणजे इडी ही स्वतंत्र यंत्रणा असल्याचे सांगितले जाते. मग आतापर्यंत भाजपाच्या एकाही नेत्याची चौकशी का नाही. विरोधी पक्षांच्या नेत्यांचीच इडीकडून चौकशी का केली जाते, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. महाविकास आघाडीचे सरकार असताना एसटी कर्मचार्‍यांनी शरद पवार यांच्या सिल्व्हर ओकवर मोर्चा नेला. त्यावेळी कामगारांना भाजपवाले चिथावणी द्यायचे. आज तुमचे सरकार आहे मग करुन टाका ना एसटीचे सरकारमध्ये विलीनीकरण. केवळ पवारांना बदनाम करण्यासाठीच भाजपाची ही रणनिती असल्याचे भुजबळ यांनी सांगितले. तर राज्यातून मोठमोठे प्रकल्प बाहेर जात असताना शिंदे-फडणवीस बघ्याची भूमिका घेत आहेत. फॉक्सकॉन नेला आणि आम्हाला पॉपकॉन दिला. महाराष्ट्राचे महत्व कमी करण्याचे हे प्रयत्न असल्याचे ते म्हणाले.

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, आमचे हिंदुत्व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांचे आहे. आम्हाला कोणी हिंदुत्व शिकविण्याची गरज नाही. केंद्राने नेहमीच दुजाभाव केला. तरीही महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्रात कर्जमाफीचा निर्णय घेतला. देशात पहिल्यांदा शरद पवार यांनी महिलांना आरक्षण दिले. त्यावरुन राष्ट्रवादीला नेहमीच टार्गेट केले जाते. आपले उद्योग दुसर्‍या राज्यात जातात मात्र ते थांबविण्यासाठी कुणीही प्रयत्न करत नाही. बंगालमध्ये पुल पडला त्यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले होते, हा सरकार बदलण्याचा इश्वरीय संकेत आहे. आता गुजरातमध्ये पुल पडून 150 नागरिकांचा मृत्यू झाला. मग आता ईश्वरीय संकेत काय आहे. जिल्हाधिकार्‍यांना दारु पितात का असे विचारणारे कृषीमंत्री सरकारमध्ये आहेत. त्यामुळे हे सरकार कोणत्या थराला गेले हे राज्यातील जनता पाहत आहे.

यावेळी अवकाळी पावसाने प्रचंड नुकसान केल्याने बळीराजा हतबल झाला आहे. त्यामुळे राज्य सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा, असा ठराव यावेळी करण्यात आला.

राष्ट्रवादीच्या दोन दिवसीय मंथन शिबिरात पहिल्या दिवशी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी हजेरी लावली. मात्र दुसर्‍या दिवशी अजित पवार अचानक गायब झाले. त्यामुळे शिबिरात उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला. अजित पवारांविषयी शिबिरात चर्चेला उधाण आले. ही वार्ता प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या कानी गेल्यानंतर त्यांनी माध्यमांसमोर येऊन अजित पवार माझी परवानगी घेऊन आजोळी असलेल्या कार्यक्रमासाठी ते गेले आहे. त्यामुळे माध्यमांनी कुठलाही गैरसमज करुन घेऊ नये, असे स्पष्टीकरण जयंत पाटील यांनी दिले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com