शरद पवार देशाचे पंतप्रधान व्हावेत : आ.काळे

वाढदिवसानिमित्त व्हर्च्युअल रॅली कार्यक्रम उत्साहात
 शरद पवार
शरद पवार

कोपरगाव (तालुका प्रतिनिधी) -

देशातील एनडीए सरकारच्या विरोधात सक्षमपणे उभे राहण्याचे धाडस व सर्वसमावेशक घटकांचा विकास घडवून आणण्याची क्षमता शरद पवार

यांच्याकडे असून 2024 च्या निवडणुकीत ते देशाचे पंतप्रधान म्हणून विराजमान व्हावेत, असे प्रतिपादन आमदार आशुतोष काळे यांनी केले.

शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या व्हर्च्युअल रॅली कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण आ.आशुतोष काळे यांच्या पुढाकारातून करोनाच्या आवश्यक उपाययोजना करून कृष्णाई मंगल कार्यालय कोपरगाव येथे करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रीय काँग्रेस तसेच मित्रपक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी आ. काळे म्हणाले, शरद पवार विचारांचा अथांग महासागर आहे. कृषी, सहकार, कला, क्रीडा, उद्योग तसेच राजकीय क्षेत्रात कर्तृत्वाच्या जोरावर स्वतःच वेगळं अस्तित्व निर्माण करणारं नेतृत्व आजमितीला देशात दुसरं नाही. सर्व पक्षांच्या प्रमुख नेत्यांसमवेत त्यांचे राजकारणविरहीत जिव्हाळ्याचे संबंध आहेत. सातत्याने समाजाच्या हिताचा विचार करताना त्यांनी आयुष्यातील 55 वर्षे देशाच्या राजकारणासाठी व्यतीत केले. राजकीय अनुभवाच्या शिदोरीवर तीन पक्षांना एकत्रित आणून राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन करून राज्यातील जनतेला विश्वास दिला.

प्रास्ताविक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष सुनील गंगुले यांनी केले. कारभारी आगवण, काका कोयटे, शिवसेनेचे शहराध्यक्ष कलविंदरसिंग दडीयाल, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष तुषार पोटे आदींनी आपले मनोगत व्यक्त केले.

यावेळी पंचायत समिती सभापती सौ. पौर्णिमाताई जगधने, उपसभापती अर्जुन काळे, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम, महाराष्ट्र पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे, कारभारी आगवन, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष माधवराव खिलारी, शहराध्यक्ष सुनील गंगुले, कार्याध्यक्ष संतोष चवंडके, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष चारुदत्त सिनगर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष नवाज कुरेशी, शिवसेना शहरप्रमुख कलविंदर डडियाल, राष्ट्रीय युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष तुषार पोटे, सुनील साळुंके, माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील,शिवसेनेचे माजी शहरप्रमुख असलम शेख, भरत मोरे, राष्ट्रवादी महिला तालुकाध्यक्षा सौ.स्वप्नजा वाबळे, शहराध्यक्षा सौ.प्रतिभा शिलेदार, महिला युवती अध्यक्षा नगरसेविका सौ.माधवी वाकचौरे, नगरसेवक गटनेते विरेन बोरावके, मंदार पहाडे, हाजीमेहमूद सय्यद, सुनील शिलेदार, राजेंद्र वाकचौरे, अजीज शेख, फकीरमामू कुरेशी, कृष्णा आढाव, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा परिषद,सुधाकर दंडवते सौ.सोनाली साबळे, सौ.सोनाली रोहमारे, पंचायत समिती सदस्य मधुकर टेके, श्रावण आसने,अनिल कदम, महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव धरमशेठ बागरेचा,कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक विश्वासराव आहेर, पद्माकांत कुदळे, बाळासाहेब बारहाते, राजेंद्र घुमरे, विठ्ठलराव आसने, काकासाहेब जावळे, ज्ञानदेव मांजरे, सचिन रोहमारे, संजय आगवण, सचिन चांदगुडे, सूर्यभान कोळपे, अशोक तीरसे, मीननाथ बारगळ, हरिभाऊ शिंदे, आनंदराव चव्हाण, सुनील शिंदे, सर्जेराव कोकाटे, राजेंद्र मेहेरखांब, अरुण चंद्रे, अशोकमामा काळे व संलग्न संस्थांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व आजी - माजी संचालक राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना व मित्र पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आदी उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com