
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी भवन येथे लोकसभा मतदारसंघनिहाय आढावा बैठक पार पडली. या बैठकीत कोल्हापूर, हातकणंगले, रावेर, बारामती, शिरूर, सातारा, माढा लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेण्यात आला. आज गुरुवारी (19 ऑक्टोबर) अहमदनगर, दिंडोरी, हिंगोली, वर्धा, अमरावती, बीड, भिवंडी व जालना लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला जाणार आहे.
राज्यातील लोकसभा मतदार संघाच्या आढावा घेण्यासंबंधी बैठक बोलावली होती. यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातील काही मतदार संघांचा समावेश होता. याच बैठकीत चक्क अजित पवार यांच्यासोबत गेलेले शिराळा मतदार संघाचे आमदार मानसिंह नाईक हेसुद्धा हजर होते. तेव्हा या बैठकीत त्यांचे हजर राहणे हे राष्ट्रवादीत नेमके चालले तरी काय असा प्रश्न उपस्थित करणारा आहे.