नगरच्या ‘शंकर’चा फोन खणखणताच संगमनेरातील अवैध व्यवसाय बंद

नगरच्या ‘शंकर’चा फोन खणखणताच संगमनेरातील अवैध व्यवसाय बंद

संगमनेर |शहर प्रतिनिधी| Sangamner

अहमदनगर येथील ‘शंकर’ नावाच्या एका पोलीस कर्मचार्‍याचा संगमनेर शहरातील अवैध व्यवसायावर चांगलाच दबदबा वाढला आहे. काल या ‘शंकर’चा फोन येताच शहरातील सर्व अवैध व्यवसाय तातडीने बंद झाले. संगमनेर शहर व परिसरात सुरू असलेले अवैध व्यवसाय या कर्मचार्‍यांच्या इच्छेनुसार सुरू व बंद असतात अशी दबकी चर्चा शहरात सुरू आहे. पोलीस खात्यातील एक ‘शंकर’ आपणच वरिष्ठ अधिकारी असल्याच्या अविर्भावात वागत असल्याने तालुक्यातील अवैध व्यवसाय करणार्‍यांना तो डोकेदुखी ठरला आहे.

शहरातील अवैध व्यवसाय बंद करण्याची सूचना केली. या सुचनेनुसार सकाळी 11 नंतर शहरातील जवळपास सर्वच बेकायदेशीर व्यवसाय बंद झाले. यामुळे हा कर्मचारी नेमका कोण? याबाबत चर्चा सुरू झाली आहे. यामुळे स्थानिक अधिकार्‍यांसमोरही तो डोकेदुखी बनला आहे. स्थानिक पोलीस कर्मचार्‍यांना न जुमानणारे अवैध व्यवसाय करणारे या कर्मचार्‍याला मात्र चांगलेच घाबरु लागले आहेत.

बेकायदेशीर व्यवसाय करणार्‍यांविरुद्ध कारवाई करण्यासाठी स्थानिक पोलीस अनेकदा टाळाटाळ करतात. स्थानिक पोलीस कारवाई करत नसल्याने यावर उपाय म्हणून जिल्हा पोलीस प्रमुख एक स्वतंत्र शाखा चालवतात. जिल्ह्यात कोणत्याही तालुक्यात जाऊन कारवाई करण्याचा अधिकार या शाखेतील कर्मचार्‍यांना दिलेला आहे. संगमनेर तालुक्यात अनेकदा या शाखेकडून अचानक छापे टाकले जातात. यामुळे या शाखेच्या पथकाची अवैध व्यावसायिकांना धास्ती असते.

काही वर्षांपासून या शाखेत कार्यरत असलेला एक कर्मचारी वेगवेगळे कारनामे करत असतो. पोलीस निरीक्षक असल्याच्या अविर्भावात त्याची वागणूक असते. संगमनेर तालुक्यात या कर्मचार्‍यांचा हस्तक्षेप वाढलेला आहे. संगमनेर येथे त्याचा एक हस्तक आहे. हा हस्तक त्याला वेळोवेळी टीप देत असतो. यानुसार संगमनेरात येऊन अवैध व्यवसायावर कारवाई केली जात असल्याची चर्चा आहे. शहरातील कोणाचा अवैध व्यवसाय चालू ठेवायचा व कोणाचा बंद करायचा याचा निर्णय हाच कर्मचारी घेत असल्याची चर्चा आहे.

शहरात गेल्या काही महिन्यांपासून त्याचा हस्तक्षेप मोठ्या प्रमाणावर वाढलेला आहे. संगमनेर येथील पोलीस अधिकार्‍यांना कल्पना न देता ही परस्पर कारवाई होत आहे. या कर्मचार्‍यांच्या वाढत्या हस्तक्षेपामुळे स्थानिक पोलिसांमधून संताप व्यक्त केला जात आहे. वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी त्याला वेळीच आवर घालावा, अशी चर्चा पोलीस खाजगीत करताना दिसत आहेत.

सत्ताधारी नेत्याशी असलेल्या संबंधाचा फायदा

अहमदनगर येथील हा कर्मचारी मूळचा राहाता तालुक्यातील आहे. या कर्मचार्‍यांचे नातेवाईक स्थानिक सत्ताधार्‍यांशी निगडित असल्याने त्याचा फायदा हा कर्मचारी उठवत आहे. मोठ्या राजकीय नेत्याची असलेल्या संबंधामुळे या कर्मचार्‍याकडे वरिष्ठ अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याचीही चर्चा आहे.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com