सोनई (वार्ताहर) -

नेवासा तालुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्वाच्या समजल्या जाणार्या शनीशिंगणापूर ग्रामपंचायत निवडणूक राज्याचे जलसंधारण

मंत्री शंकरराव गडाख यांच्या नेतृत्वाखाली बिनविरोध झाल असून या निमित्ताने शनी शिंगणापूर ग्रामस्थांनी मंत्री गडाख यांच्या नेतृवावर विश्वास व्यक्त करत त्यांना एकमुखी पाठिंबा व्यक्त केल्याचे यातून सिद्ध झाले आहे.

शनीशिंगणापूर ग्रामपंचायत बिनविरोध हे मंत्री शंकरराव गडाखांना मोठे यश समजले जाते. राजकीयदृष्ट्या महत्वाची असलेली शनीशिंगणापूर ग्रामपंचायत गेल्या दहा वर्षांपासून विरोधकांच्या ताब्यात होती. गावाची कुठलीही निवडणूक मोठी राजकीय धुळवड उडवून देणार्या ठरल्या. त्यामुळे नेहमीच येथील अटीतटीने वातावरण तणावपूर्णच राहिले आहे. मात्र गावातील ज्येष्ठ नेते बापूसाहेब शेटे यांनी मंत्री शंकरराव गडाख यांचे नेतृत्वावर विश्वास व्यक्त करून त्यांचे नेतृत्व मान्य करत माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांना सोडचिट्टी दिली.

नवीन बिनविरोध सदस्य- शिवाजी जगन्नाथ शेटे, कल्पनाताई शरद देठे, कुसूमताई जालिंदर दरंदले, बेबीताई भिमराज बानकर, पुष्पाताई बाळासाहेब बानकर, स्वप्नील बाळासाहेब बोरुडे, वैशालीताई रमेश शेटे, बाळासाहेब बापुसाहेब कुर्हाट, राजेंद्र तुकाराम शेटे,

शनीशिंगणापूर देवस्थानच्या बदनामीचे षडयंत्र रचत व विकासाला खिळ बसविण्याच्या हेतूने मागील फडवणीस सरकारच्या काळात तत्कालीन आमदार यांनी केवळ राजकीय हेतू व सूडबुद्धीतून शनीशिंगणापूर देवस्थान ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र राजकीय हेतूने केलेल्या या सर्व तक्रारीचा या चौकशीत देवस्थानला क्लीनचिट मिळाल्याने तक्रारदारांसह माजी आमदार यांचा खरा चेहरा भाविकांसह ग्रामस्थांच्याच्या समोर उघडा पडल्याने बोलले जात आहे.

तसेच नुकत्याच झालेल्या विश्वस्त मंडळाच्या निवडी रूढी व परंपरेनुसारच व्हाव्यात यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे आग्रह धरून परंपरेनुसारच विश्वस्तांच्या निवडी जाहीर झाल्याने संपूर्ण शनीशिंगणापूर ग्रामस्थांनी आपले स्थानिक राजकीय मतभेद व मनभेद विसरून मंत्री शंकरराव गडाख यांच्या नेतृवावर विश्वास व्यक्त करत त्यांना एकमुखी पाठिंबा व्यक्त केला.

शनीशिंगणापूर ग्रामपंचायत निवडणुकीकडे विशेषतः संपूर्ण नेवासे तालुक्याचे लक्ष लागलेले होते. 9 सदस्य संख्या असलेल्या जागांसाठी एकूण 39 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. मात्र मंत्री गडाख यांच्या आवाहानास प्रतिसाद देत 30 जणांनी अर्ज मागे घेतल्याने सर्व सदस्यांच्या निवडी बिनविरोध झाल्या असून फक्त प्रशासनाकडून या निवाडीच्या घोषणेची औपचारिकता बाकी असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी संजय खोले यांनी सांगितले.

शनिशिंगणापूर ग्रामपंचायत बिनविरोध करण्यात मंत्री गडाख यांना यश आल्याने तालुक्याच्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत गडाख गटांचा हा मोठा विजय समजला जाता.

गाव व परिसराच्या विकासासाठी मंत्री शंकरराव गडाखांच्या नेतृत्वाखालीच काम करण्याचा निर्णय संपूर्ण ग्रामस्थांनी घेतला आहे. त्यांच्याच नेतृत्वाला ग्रामपंचायत बिनविरोध झाली असून यातूनच त्यांना ग्रामस्थांचा एकमुखी पाठिंबा व्यक्त झाला आहे.

- बापूसाहेब शेटे ज्येष्ठ नेते, शनीशिंगणापूर

काही काळ आम्ही भरकटलो होतो. बाहेरील लोक गावात येऊन विकासाचे काम न करता आपल्या राजकीय स्वार्थासाठी ग्रामस्थांत फूट पाडत होते व गावाची तसेच देवस्थानची बदनामी करत होते. यापुढे अशा प्रवृत्तीला थारा न देता नामदार गडाख यांच्या मागे खंबीरपणे उभे राहणार आहोत.

- बाळासाहेब कुर्हाट, ग्रामपंचायत सदस्य