शनीमंदिरात पुजा साहित्यातील ‘यंत्रा’स बंदी

शनीमंदिरात पुजा साहित्यातील ‘यंत्रा’स बंदी

सोनई |वार्ताहर| Sonai

श्रीक्षेत्र शिंगणापूर येथे पूजा साहित्य ताटातील ‘यंत्रे’ शनी मंदिरात नेण्यास देवस्थान विश्वस्त मंडळाने दि.4 मे पासून बंदी घातली आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी की अमावस्या यात्रेच्या वेळी पूजा साहित्य ताटातील नवग्रह, शनियंत्र, शिक्का व कलश यंत्र मंदिर व परिसरात सगळीकडे पडून लोकांच्या पायदळी तुडवली जात असल्याच्या तक्रारी विश्वस्त मंडळाकडे भाविकांनी केल्याने या यंत्राचे पावित्र्य जपण्यासाठी तसेच अनेक दिवसापासून यंत्राच्या किमती विक्रेते मनमानी घेत असल्याच्या भाविकांच्या तक्रारीवरुन विश्वस्त मंडळाने ही सर्व यंत्रे मंदिरात नेण्यास बंदी घातली आहे. या निर्णयामुळे भाविकांची लूट थांबणार असून भाविकांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.

सुरक्षारक्षकांनी मंदिर प्रवेशद्वारावरच भाविकांच्या पूजा ताटातील यंत्रांना बंदी असून ती पुन्हा दुकानदाराला मागे देण्यास सांगितले जात आहे. पूजा ताटात तेल, रूईच्या पानाचा हार-फुले, लोखंडी नाल व श्रीफळ हे साहित्य मंदिर प्रवेशद्वारातून आत घेऊन जाण्यास परवानगी दिलेली आहे.

Related Stories

No stories found.