
शनीशिंगणापूर |वार्ताहर| Shanisinganapur
नेवासा तालुक्यातील शनीशिंगणापूर येथे चौथर्यावर जावून शनीदर्शनासाठी देवस्थानकडून आकारल्या जाणार्या शुल्काविरोधात विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाने शनीचौथर्याजवळ आंदोलन केले.
शनैश्वर देवस्थान ट्रस्ट चौथर्यावर जाऊन तेल वाहण्यासाठी व दर्शनासाठी भाविकांकडून देणगी शुल्क आकारते. त्याविरोधात काल शनिवारी विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाने श्री शनी चौथर्याजवळ आंदोलन सुरु केले. आंदोलकांनी आक्रमक पावित्र घेत भाविकांसाठी चौथर्यावरुन मोफत दर्शन सुरू केले. देवस्थान प्रशासनानेही त्यांना कुठलाही विरोध केला नाही. त्यामुळे भाविकांना काल चौथर्यावर मोफत दर्शन घेता आले.
या आंदोलनात विश्व हिंदू परिषदेचे जिल्हाध्यक्ष डॉ. दिलीप शिरसाठ, जिल्हामंत्री श्रीकांत नळकांडे, सहमंत्री विशाल वाकचौरे, बजरंग दल जिल्हा संयोजक अश्विनीकुमार बेल्हेकर, बजरंग दल प्रखंड संयोजक कुलदीप ठाकूर, श्रीप्रसाद कानडे, अमित कुलकर्णी, शहर मंत्री प्रदीप जाधव, तालुका अध्यक्ष अमित मुथा, प्रखंड मंत्री प्रशांत बहिरट, दुर्गावाहिनी प्रांत संयोजिका अमृता नळकांडे, दुर्गावाहिनी संयोजिका सपना थेटे आदींनी सहभाग घेतला.
लवकरच सकारात्मक निर्णय
चौथर्यावरुन मोफत दर्शनाबाबत प्रशासन लवकरच सकारात्मक निर्णय घेईल, अशी ग्वाही शनैश्वर देवस्थानचे उपकार्यकारी अधिकारी नितीन शेटे यांनी दिली.