पहिल्याच दिवशी एक हजार भाविकांकडून शनीचौथर्‍यावर जाऊन तेलअभिषेक

शनैश्वर देवस्थानला मिळाली 5 लाखांची देणगी
पहिल्याच दिवशी एक हजार भाविकांकडून शनीचौथर्‍यावर जाऊन तेलअभिषेक

सोनई |वार्ताहर| Sonai

शनिशिंगणापूर येथे भाविकांना शनी चौथर्‍यावर जाऊन शनिवारपासून तेल अभिषेक करण्यास सुरुवात झाली असून या निर्णयाचे भाविकांनी स्वागत केले. पहिल्याच दिवशी एक हजार भाविकांनी अभिषेक केला असून यातून देवस्थानला पाच लाख रुपयांची देणगी जमा झाली आहे.

सशुल्क चौथर्‍यावर दर्शन घेतलेल्या भाविकांना देवस्थानच्यावतीने श्रीफळ, प्रसाद, उदी व शनीदेवाचा फोटो देऊन सन्मान करण्यात आला. रविवारी सायंकाळपर्यंत तिनशे भाविकांनी चौथर्‍यावर जाऊन दर्शन घेतले.

देशभरात अनेक देवस्थानमध्ये भाविकांची गर्दी होऊन गैरसोय टाळण्यासाठी तेथील देवस्थाने दर्शनाकरिता पेड पासची व्यवस्था केली आहे. त्याच पद्धतीने श्री शनैश्वर देवस्थान ट्रस्टने भाविकांची मागणी लक्षात घेऊन शनिवार दि. 18 पासून पाचशे रुपयांची देणगी पावती घेऊन चौथर्‍यावर जाऊन तेल अभिषेक करण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com