शहर टाकळीतही लम्पी स्किन आजाराची जनावरे आढळली

पशुसंवर्धन विभागाकडून लसीकरणाला वेग

संगहीत चित्र
संगहीत चित्र

शेवगाव |शहर प्रतिनिधी| Shevgav

शहरटाकळी येथील बाबासाहेब मोहन पानकर या शेतकर्‍याच्या मालकीच्या एका गाईमध्ये जनावरांच्या लम्पी सदृष आजाराची लक्षणे आढळुन आल्याने परिसरातील शेतकर्‍यांत चिंतेचे व घबराटीचे वातावरण पसरले आहे.

पशुसंवर्धन विभागाने परिसरातील शेतकर्‍यांच्या जनावरांचे लसीकरणाची मोहीम तातडीने राबवुन व संसर्ग जन्य असलेल्या जनावरांच्या याआजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी इतर आवश्यक सुविधांची तातडीने अमलबजावणी करून शेतकर्‍यांना दिलासा देण्याची मागणी होत आहे.

तालुक्यातील भातकुडगाव येथील एका शेतकर्‍याच्या दोन गाईमध्ये लम्पी या संसर्गजन्य आजाराची लक्षणे आढळुन आल्याने मागील आठवड्यात पशुसंवर्धन विभागाने भातकुडगावसह नजीकच्या भायगाव, बख्तरपुर, आखतवाडे, आपेगाव, जोहरापुर, लोळेगाव परिसरात जनावरांच्या लसीकरणाला वेग दिला आहे. भातकुडगाव येथील दोन पैकी एक गाय उपचारानंतर आता पूर्णपणे बरी झाली आहे. सोमवार पासुन शहरटाकळीसह नजीकच्या मजलेशहर, मठाचीवाडी, भावीनिमगाव परिसरातील पशुधनाच्या लसीकरणास सुरवात झाली असुन येत्या दोन दिवसात दहिगाव ने, देवटाकळी येथेही लसीकरण सुरू करण्यात येणार असल्याची माहिती पशुधन विकास अधिकारी डॉ अनिल धस यांनी दिली

तालुका पशुधन विकास अधिकारी डॉ चारुदत्त असलकर, सहायक पशुधन विकास अधिकारी डॉ शेषराव शेळके यांच्यासह गटविकास अधिकारी महेश डोके यांनी तालुका पशुसंवर्धन विभागाच्या अधिकारी कर्मचार्‍यांनी तालुक्यात विविध ठिकाणी भेटी देऊन पशुधनाची पाहणी करून संबंधितांना जनावरांच्या या संसर्गजन्य आजाराची साथ फैलावणार नाही याबाबत महत्वपुर्ण सूचना दिल्या.

तालुक्यात गाय म्हैस बैल वासरू वर्गातील पशुधनाची संख्या 91 हजार 886 असुन यापैकी फक्त गाय वर्गातील पशुधनाची संख्या मागील वर्षी च्या पशु गणने नुसार 70 हजार 687 आहे. तालुक्यासाठी आता पर्यंत लसीचे 13 हजार 500 डोस उपलब्ध झाले असुन रविवार अखेर तालुक्यातील सुमारे साडे पाच हजार गाय वर्गातील पशुधनास लसीकरण झाले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com