प्रचार सुरू, पण रंगत कमीच!

शहर सहकारी बँक निवडणुकीसाठी 29 जानेवारीला मतदान
प्रचार सुरू, पण रंगत कमीच!

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

शहर सहकारी बँकेच्या निवडणुकीत सत्ताधार्‍यांकडून जोरात प्रचार सुरू असता तरी या निवडणूक रिंगणात प्रतिस्पर्धी पॅनेल नसल्याने रंगत कमी आहे. येत्या 29 जानेवारीला या बँकेच्या 14 जागांसाठी मतदान होणार असून, निवडणूक रिंगणात 20 उमेदवार आहेत. सत्ताधारी घैसास-गुंदेचा मित्र मंडख पॅनेलच्या उमेदवारांसह अपक्ष उभे असलेल्या अन्य सहाउमेदवारांनी ही मतदारांच्या भेटीगाठी सुरू केल्या आहेत.

स्थापनेचा सुवर्ण महोत्सव साजरा करीत असलेल्या शहर सहकारी बँकेची निवडणूक कोविडमुळे लांबणीवर पडली होती. ती आता होऊ घातली आहे. मागच्या डिसेंबर 2022 मध्येच ही निवडणूक होणार होती. पण त्याकाळात ग्रामपंचायत निवडणुकांमुळे ती पुढे ढकलली गेली. त्यामुळे आता नव्या निवडणूक कार्यक्रमानुसार येत्या 29 जानेवारीला मतदान व 30 जानेवारीला मतमोजणी होणार आहे.

या निवडणुकीच्या आधीच्या कार्यक्रमात इतर मागास प्रवर्ग मतदारसंघातून संजय घुले व विशेष मागास प्रवर्गातून सुनील फळे यांची बिनविरोधनिवड झाली होती. मात्र, फळे यांचे निधन झाल्याने आता विशेष मागास प्रवर्गाचीही निवडणूक होत आहे. घुले यांची बिनविरोध निवड कायम राहिली आहे. त्यामुळे सर्वसाधारण मतदार संघातील 10, महिलांसाठीच्या दोन आणि अनुसूचित जाती-जमाती व विशेष मागास प्रवर्गातील प्रत्येकी एक अशा 14 जागांसाठी निवडणूकहोत आहे.

रिंगणात आहेत 20 जण

शहर बँकेच्या निवडणूक रिंगणात 20 उमेदवार नशीब आजमावत आहेत. सर्वसाधारण मतदारसंघातील 10 जागांसाठी सत्ताधारी घैसास-गुंदेचा मित्रमंडळ पॅनेलचे डॉ. भूषण अनभुले, शिवाजी कदम, अशोक कानडे, सुभाष गुंदेचा, डॉ. विजयकुमार भंडारी, निखील नहार, सुजीत बेडेकर, जयंत येलूलकर, प्रा. माणिक विधाते व सीए गिरीश घैसास या दहा उमेदवारांसह दिलीप अडगटला व अनिल चुडीवाला हे स्वतंत्र उभे आहेत. महिलांच्या दोन जागांसाठी सत्ताधारी पॅनेलच्या रेश्मा चव्हाण-आठरे व स्वाती कांबळे या दोन उमेदवारांसह नयना अडगटलाही रिंगणात आहेत. तर अनुसूचित जाती-जमाती मतदारसंघातील सत्ताधारी पॅनेलचे उमेदवार प्रदीपकुमार जाधव यांच्या विरोधात सारंग क्षेत्रे व अरुण राठोड उभे आहेत. तसेच विशेष मागास प्रवर्गातील सत्ताधारी पॅनेल उमेदवार दत्तात्रय रासकोंडा यांच्या विरोधात सचिन अडगटला नशीब आजमावत आहेत. यानिवडणुकर्डीं 12 हजार 110 पात्र मतदार आहेत. 29 रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 पर्यंतयेथील भाऊसाहेब फिरोदिया शाळेतील मतदान केंद्रात मतदान होणार आहे व 30 रोजीसकाळी मतमोजणी होणार आहे.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com