शहाजापूर वनक्षेत्रात डोंगराला आग

चारा, वृक्ष, वन्यप्राण्यांची होरपळ
शहाजापूर वनक्षेत्रात डोंगराला आग

पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner

तालुक्यातील शहाजापुर परिसरात डोंगरावर लागलेल्या अगीत मोठ्या प्रमाणात सुका चारा, वृक्ष नष्ट झाले . तर अनेक वन्य जीव होरपळल्याची घटना घडली. या आगी रोखण्यासाठी उपायोजना करण्याची मागणी नाकरीकांकडून होत आहे.

पारनेर तालुक्यात मोठ्या प्रमाणात डोंगर तसेच याच भागात वनक्षेत्र आहे. प्रत्येक वर्षी उन्हाळ्यात या भागात कोणत्या कोणत्या डोंगराला आग लागल्याचे चित्र दिसते. यात वन विभागाच्या जंगलाना मोठ्या प्रमाणात आगी लागून दरवर्षी लहान मोठे वृक्ष जळून नष्ट होत आहेत. या आगी मुद्दाम लावल्या जातात की, रस्ताने जाणार्‍या व्यक्तींकडून बिडी, शिगारेट फेकल्यामुळे लागतात याबाबत वन विभागही अनभिज्ञ आहे. परंतु या आगीमुळे जंगलच्या जंगले बेचिराख होतात तसेचे शेकडो टन चारा नष्ट होतो. तर हजारे वन्य जिवाना जीव मुठीत घेऊन पळावे लागले आन्यथा आगीत होरपळून जावे लागते. पाण्याच्या दुर्भिक्षामुळे आगोदरच या वन्येजीवाना पाण्यासाठी वनवन करावी लागत आसताना डोंगरांना लावल्या गेलेल्या आगींमुळे त्यांना जीवही गमवावा लागत आहे.

डोंगर तसेच जंगलाना आग लागू नये म्हणुन वन विभागाच्या तवीने दरवर्षी उन्हाळ्यापुर्वी रस्त्यांच्या कडेने ठरावीक अंतरावर झाळ पट्टे तयार केले जातात. परंतु तरिही आगी लागत असल्याने समाज कंठक मुद्दाम आगी लावत असल्याची शंका उपसिथत होत आहे. दर उन्हाळ्यात लागणार्‍या आगी थोपवण्याठी वन विभागाच्या वतीने वनक्षेत्राजवळील गावांमध्ये पथके तयार केली आहेत.

मात्र ती जागृक नसल्याने वेळेत आग विझवण्यात अपयश येत आहे. यासाठी सर्व पथकांना नव्याने गठीत करून त्यांना योग्य ती साधने देण्याची गरज नागरीकांकडून व्यक्त होत आहे. जेण आग लागलेल्या ठिकाणी ताबडतोब पोहचून आग्निकांन्ड थांबवता येईल. अन्यथा वर्षभर संभाळलेली झाडे .गवत काही मिनीटात राखेत रुपातर होत आहे .जंगलाना लागणार्‍या या आगीमुळे पर्यावरणाचे मोठे नुकसान होत आहे.

Related Stories

No stories found.