लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार

अश्‍लील व्हिडिओ व्हायरल करण्याचीही धमकी
लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार

पारनेर (प्रतिनिधी) / parner - 20 वर्षीय तरुणीचा गेल्या तीन वर्षांपासून पाठलाग करून, लग्नाचे आमीष दाखवून तिच्या इच्छेविरोधात बळजबरीने अत्याचार (sexual harassment) करणार्‍या गोरेगाव येथील अनिल गंगाधर नांगरे याच्या विरोधात पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यासंदर्भात पीडितेने पारनेर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. आरोपी अनिलने मार्च 2018 ते 29 जून 2021 या कालावधीत तिच्यावर अत्याचार केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. आरोपीने या तरुणीशी ओळख करून तिच्याशी लग्न करण्याचे आश्‍वासन दिले.

तिची इच्छा नसतानाही कान्हूर रस्त्यावरील लॉजवर घेऊन जाऊन अत्याचार केला. अत्याचारानंतर पीडितेसोबत लग्नास नकार दिला. तसेच बदनामीकारक मजकूर सोशल मीडियावर व्हायरल करून तरुणीसह तिच्या घरातील सदस्यांची बदनामी केली. ‘हॉटेलमध्ये तुझा काढलेला व्हिडीओ व्हायरल करतो,’ अशी धमकीही अनिल नांगरे तिला देत होता, असे फिर्यादीत म्हटले आहे.

नांगरेच्या जाचाला कंटाळून पीडितेने पारनेर पोलीस ठाण्यात येऊन त्याच्याविरोधात फिर्याद दाखल केली. पोलीस निरीक्षक घनश्याम बळप हे स्वतः या गुन्ह्याचा तपास करीत आहेत. मिळालेल्या माहीतीनुसार आरोपी अनिल हा लष्करातील जवान आहे. वारंवार सुटी काढून तो गावी येत असे व पीडितेवर अत्याचार करीत असे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com