file photo
file photo
सार्वमत

शेवगाव : आदेशाचा भंग केल्यास गुन्हा दाखल करणार - तहसीलदार

Arvind Arkhade

शेवगाव|तालुका प्रतिनिधी|Shevgav

शहरात वाढणारा करोना संसर्ग रोखण्यासाठी तालुका प्रशासनाने शहरामध्ये 28 जुलैपर्यंत लॉकडाऊन जाहीर केला आहे. या लॉकडाऊनच्या काळात शहरामध्ये आदेशाचा भंग केल्यास गुन्हे दाखल करणार असल्याचे तहसीलदार अर्चना पागिरे यांनी सांगितले.

करोना संसर्गाचा वाढता धोका विचारात घेऊन शेवगाव शहरात रस्त्यावर, सार्वजनिक वाहतुकीच्या रस्त्यावर, गल्लोगल्ली संचार, वाहतूक, फिरणे, थांबून उभे राहणे, रेंगाळणे, गर्दी करणे असे कृत्य करण्यास जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाने मनाई करण्यात आली आहे.

शेवगाव शहरामध्ये खाजगी प्रवासी वाहतूक पूर्णपणे बंद राहील. तर खाजगी चारचाकी गाडीतून चालक व दोन अन्य व्यक्ती व दुचाकीवर केवळ चालकालाच परवानगी राहील.

शेवगाव शहरात चहा दुकाने, रसवंती, उपाहारगृहे, हॉटेल, परमिटरूम, थंड पेय दुकाने, पानटपरी, केस कर्तनालय (सलून) व ब्युटीपार्लर इत्यादी दुकाने बंद राहतील.

पुढील आदेश होईपर्यंत शेवगाव शहरातील सर्व दारू, वाईन, बिअर शॉप्स बंद राहतील. शेवगाव शहरातील किराणा दुकाने, भाजीपाला, जीवनावश्यक वस्तूंची दुकाने, सकाळी 8 ते सकाळी 11 वाजेपर्यंत सुरू राहतील. तर शहरातील दूध विक्री सकाळी 6 ते 8 व संध्याकाळी 5 ते 7 यावेळेत सुरु राहील.राष्ट्रीयीकृत बँका, पतसंस्था, मिनी बँका इत्यादी बंद राहतील.

हा आदेश शेवगाव शहरासाठी लागू असून भारतीय दंड संहिता 1860 मधील कलम 188, 169, 270 नुसार व आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 अन्वये कारवाई करण्यात येईल असा आदेश तहसीलदार अर्चना पागिरे यांच्या सहीने पारित करण्यात आला आहे.

Deshdoot
www.deshdoot.com