शिक्षक बँकेतर्फे सभासदांना सात टक्के लाभांश - सलीमखान पठाण

शिक्षक बँकेतर्फे सभासदांना सात टक्के लाभांश - सलीमखान पठाण

कोवीड कर्ज नियमात सुधारणा, कर्जदारांसाठी विशेष सेविंग सुविधा

श्रीरामपूर (प्रतिनिधी) -

जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांची कामधेनू असलेल्या अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेतर्फे सन 2020-21 या आर्थिक सालात सभासदांना सात टक्के लाभांश दिला जाणार असल्याची माहिती शिक्षक बँकेचे चेअरमन सलीमखान पठाण व व्हाईस चेअरमन बाबासाहेब खरात यांनी दिली.

शिक्षक बँकेला2020-21 या आर्थिक वर्षात 6 कोटी 87 लाख रुपये निव्वळ नफा झाला असून तरतुदी वजा जाता सभासदांना सात टक्के लाभांश रिझर्व बँकेच्या मान्यतेनंतर दिला जाणार आहे.गेल्या पंधरा वर्षानंतर पहिल्यांदा एवढा विक्रमी लाभांश मिळणार असल्याने आनंदाचे वातावरण आहे.

शिक्षक बँकेतर्फे सभासदांसाठी करोना महामारीच्या पार्श्‍वभूमीवर दोन लाख रुपये कोवीड कर्ज योजना सुरू असून या योजनेचे नियमात बदल करून सभासदाच्या कुटुंबातील सदस्याला जरी कोरोना झाला तरी त्याला कर्ज दोन लाख रुपयांचा लाभ मिळणार आहे. यासाठी सभासदाने फक्त कर्जरोखा बँकेमध्ये भरून ठेवणे आवश्यक आहे. त्यानंतर सभासद किंवा त्याच्या कुटुंबातील सदस्य दवाखान्यामध्ये अ‍ॅडमिट झाल्यास आणि त्यांनी मागणी केली असता तातडीने तो रोखा त्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे. या योजनेचा सभासदांनी लाभ घ्यावा, असे आवाहन ही पठाण व खरात यांनी केले आहे.

गुरुमाऊली मंडळाचे नेते बापूसाहेब तांबे व जिल्हाध्यक्ष राजकुमार साळवे यांच्या नेतृत्वाखाली सभासद हिताचे अनेक निर्णय संचालक मंडळाने आजपर्यंत घेतले आहेत. शिक्षक बँकेचे सभासद चिंतामुक्त करण्याचे काम गुरुमाऊली मंडळाने केले असून यापुढेही हे कार्य चालू राहील, असे चेअरमन सलीमखान पठाण यांनी सांगितले.

या सभेला माजी चेअरमन संतोष दुसुंगे, साहेबराव अनाप, शरदभाऊ सुद्रिक, राजू राहणे, विद्याताई आढाव, सीमाताई क्षिरसागर, बाळासाहेब मुखेकर, उषाताई बनकर, नानासाहेब बडाख, अर्जुन शिरसाट, अविनाश निंबोरे, किसन खेमनर, अनिल भवार, गंगाराम गोडे, राजू मुंगसे, मंजूताई नरवडे, संतोष अकोलकर, सुयोग पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप मुरदारे, ठोंबळ, संजय चौधरी आदी उपस्थित होते.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com