करोनामुळे मृत पावलेल्या शिक्षकांच्या वारसांना पावणे सात लाखांची मदत

शिक्षक संघटना, मुख्याध्यापक संघटना व सेवानिवृत्तांचा पुढाकार
करोनामुळे मृत पावलेल्या शिक्षकांच्या वारसांना पावणे सात लाखांची मदत

अहमदनगर (प्रतिनिधी)

करोनामुळे (Corona) नगर जिल्ह्यात मृत झालेल्या ज्या शिक्षकांना पेन्शन व इतर शासनाचे कोणतेच आर्थिक लाभ मिळणार नाहीत, अशा शिक्षकांच्या कुंटुबीयांना माध्यमिक शिक्षक संघटनेने (Secondary Teachers Association) आर्थिक आधार देत जवळपास पावणेसात लाखांची मदत केली. आ. डॉ. सुधीर तांबे (MLA Dr Sudhir Tambe) यांच्या हस्ते या मदतीचे वितरण करण्यात आले.

करोनामुळे मृत पावलेल्या शिक्षकांच्या वारसांना पावणे सात लाखांची मदत
Coronavirus : जिल्ह्यात आज ३९३ रुग्णांची नोंद

करोनाच्या लाटेत मृत झालेल्या ज्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांना फॅमिली पेन्शन (Family pension), ग्रॅच्युइटी (Gratuity), तसेच शासनाचे इतर आर्थिक लाभ मिळणार नाहीत, अशा मृत शिक्षकांच्या वारसांसाठी प्रत्येकी 81 हजार रुपयांची मदत शिक्षक संघटनेने जमा केली. 6 लाख 67 हजार रुपयांची मदत शुक्रवारी डॉ. तांबे यांच्या हस्ते कुटुंबातील वारसांना वितरित करण्यात आली.

शिक्षक संघटनेने मृत शिक्षक सहकार्‍यांच्या कुटुंबाला केलेल्या मदतीमुळे नातेवाइकांपेक्षाही कोणीतरी जवळचे काळजी घेणारे आहेत, ही भावना कुटुंबीयांमध्ये निर्माण झाली, असे आ. तांबे यांनी सांगितले.

करोनामुळे मृत पावलेल्या शिक्षकांच्या वारसांना पावणे सात लाखांची मदत
पारनेर तालुक्यातील 'या' 21 गावात कडक लॉकडाऊन

शिक्षक नेते राजेंद्र लांडे (Rajendra Lande) यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक संघटना, मुख्याध्यापक संघटना व सेवानिवृत्त सहकार्‍यांच्या मदतीने हा मदत निधी उभारण्यात आला. यावेळी मुख्याध्यापक संघटनेचे अध्यक्ष सुनील पंडित, प्राचार्य अशोक दोडके, आबासाहेब कोकाटे, सुधीर काळे, तुकाराम कन्हेरकर, काकासाहेब वाळुंजकर आदी उपस्थित होते. मदत निधी संकलन धनजंय म्हस्के, महादेव भद्रे, रावसाहेब बाबर, प्राचार्य ज्ञानदेव बेरड, विष्णू मगर, प्राचार्य भाऊसाहेब रोहोकले, उत्तम कांडेकर, जफर सय्यद, अन्सार शेख यांनी केले. प्रास्ताविक उद्धव गुंड यांनी केले. महादेव भद्रे यांनी आभार मानले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com