कुकाणा : एकाच घरातील सात करोना बाधीत
सार्वमत

कुकाणा : एकाच घरातील सात करोना बाधीत

सर्व रुग्णांना विलगीकरण कक्षामध्ये नेण्यात आले आहे.

sukhdev fulari

नेवासा | तालुका प्रतिनिधी | Newasa

तालुक्यातील कुकाणा येथे गेल्या ३ दिवसात १० करोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहे. येथील एका ८५ वर्ष वयाच्या करोना बाधित रुग्णाच्या घरातील ७ जण करोना पॉझिटिव्ह निघाल्याने त्यांना नेवासा फाटा येथील विलगीकरण कक्षामध्ये नेण्यात आले आहे.

कुकाणा येथील बाधित राहत असलेल्या परिसराला तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांच्या आदेशाने १४ दिवसासाठी सील करण्यात आला आहे. तसेच परिसरातील नागरिकांनी विनाकारण घराबाहेर फिरू नये अशी सूचना देण्यात आल्याबाबतची माहिती प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधिकारी रामेश्वर शिंदे यांनी दिली आहे.

Deshdoot
www.deshdoot.com