राहात्यात एकाच दिवसात 10 करोना बाधित
सार्वमत

राहात्यात एकाच दिवसात 10 करोना बाधित

एकाच कुटूंबातील पाच जणांचा समावेश

Nilesh Jadhav

राहाता|तालुका प्रतिनिधी|Rahata

राहातेकरांची धाकधुक वाढली एकाच दिवसात दहा जणांना करोनाची बाधा झाल्याने त्या परिसरातील भाग लॉकडाऊन करण्यात आला आहे.

गेल्या आठ दिवसापासून राहाता शहरात करोनाचे रूग्ण सापडत असून आज 10 जणांचा अहवाल पॉझीटीव्ह आल्याने प्रशासन व नागरीकांची चिंता वाढली आहे . शहरातील साईनगर मधील दोन दिवसापुर्वी मयत झालेल्या व्यक्कीच्या कुटूंबातील पाचजण करोना बाधीत निघाले तर त्यांच्या संपर्कातील 16 जणांचा अहवाल निगेटीव्ह आले.

तसेच राहाता ग्रामीण रूग्णालयासमोरील परीसरात एका आरोग्य कर्मचार्‍याचे दोन दिवसापूर्वी निधन झाले त्याच्या कुटूंबातील दोन जण करोना बाधीत निघाले तर शहरातील गावठाण परिसरातील गणपती चौका लगत एकाच कुटूंबातील तिन जणांना करोनाची बाधा झाल्याने गावठाणात पुन्हा करोनाने शिरकाव केला आहे.

राहाता शहरातील एकुण 43 जणांवर कोवीड सेंटरमध्ये उपचार सुरू असून 19 जण बरे होऊन घरी परतले आहे. रोज करोना रूग्णांची संख्या वाढत चालल्याने आरोग्य विभाग व पालीका प्रशासनाची डोकेदुखी वाढत चालली आहे.

नागरिकांनी बाहेरगावी प्रवास करू नये, बाहेर गावावरून आलेल्या व्यक्तींना करोनाची बाधा झाल्याचे आतापर्यंत आढळून आले असून नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, लहान मुले व वृध्दांची काळजी घ्यावी तसेच कोणी करोना बाधीत रूग्णाच्या सहवासात आला असल्यास त्वरीत आरोग्य विभागाशी संपर्क साधावा किंवा कोवीड चाचणी करून घ्यावी, असे आवाहन राहाता ग्रामीण रूग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. स्वाती म्हस्के यांनी केले आहे.

Deshdoot
www.deshdoot.com