रुग्णांंना रेमडीसीवीर इंजेक्शन आणण्यास सांगणार्‍या कोविड सेंटरची चौकशी करा- सेठी

रुग्णांंना रेमडीसीवीर इंजेक्शन आणण्यास सांगणार्‍या कोविड सेंटरची चौकशी करा- सेठी

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

शासनाने नेमून दिलेल्या दवाखान्यात रेमडीसीवीर इंजेक्शन मिळत नाहीत. या इंजेक्शनचा तुम्ही शोध घेऊन आणून द्या,

आम्ही रुग्णास देऊ, असे वक्तव्य अनेक रुग्णालयात रुग्णांच्या नातेवाईकांना ऐकावे लागत आहे. त्यामुळे शासनाने अशा कोविड सेंटरची चौकशी करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष लकी सेठी यांनी केली आहे.

श्री. सेठी यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, रेमिडीसीविर इंजेक्शन आता मेडिकल दुकानात मिळत नाही. शासनाने हे इंजेक्शन कमी पडू दिले जाणार नाहीत, असे आश्वासन दिले असले तरी ही इंजेक्शन तुटवडा जाणवत आहे. कोविड सेंटर चालक म्हणतात आम्हाला इंजेक्शन मिळत नाही मिळाले. तरी मागणीपेक्षा कमी मिळत आहेत. यामुळे आम्ही रुग्णांना देऊ शकत नाही.

मात्र, या इंजेक्शनचा सर्रास काळाबाजार होत आहे. हे इंजेक्शन 20 ते 25 हजार रुपयांपर्यंत बाजारात विकले जात आहे. बाजारात मुळातच नातेवाईक, मित्र कोविडच्या भीतीपोटी रुग्णास कमी भेटतात. त्यात इंजेक्शनची उपलब्धता रुग्ण करू शकत नाही. यामुळे रुग्णास मानसिक त्रास होतो.

एकीकडे शासन रेमिडीसीविरचा उपलब्ध साठा असल्याचा दावा करीत आहे. परंतु, रुग्णास इंजेक्शन मिळत नाही व जे सेंटर रुग्णास इंजेक्शनची मागणी करीत आहेत त्यांची चौकशी करावी व इंजेक्शनचा मुबलक साठा उपलब्ध करावा, अशी मागणी सेठी यांनी केली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com