विविध क्षेत्रांत सेवाकार्य करणार्‍यांचा केला गौरव

विविध क्षेत्रांत सेवाकार्य करणार्‍यांचा केला गौरव

श्रीरामपूर |प्रतिनधी| Shrirampur

येथील बहुजन टायगर फोर्स व कॉलेज स्टॉप मित्र मंडळाच्यावतीने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा 131 व्या जयंतीच्या निमित्ताने विविध क्षेत्रा सेवाकार्य करणार्‍या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. यावेळी भीमगितांचा कार्यक्रमही उत्साहात पार पडला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संजय रुपटक्के व बाळासाहेब हिवराळे होते याप्रसंगी वैद्यकीय क्षेत्रातील सेवा कार्य करणारी डॉ. कुमार चोथानी, डॉ. रवींद्र जगधने, डॉ. अजित देशपांडे व डॉ. सौ सरिता देशपांडे, डॉ. वसंत जमदाडे, डॉ. मच्छिंद्र त्रिभुवन तसेच सामाजिक विधी सेवा क्षेत्रातील अ‍ॅड. बाबा औताडे अ‍ॅड. अजितसिंग परदेशी, अ‍ॅड. बाबा शेख, अ‍ॅड. तुषार चौदंते, अ‍ॅड. प्रविण पांडे शैक्षणिक क्षेत्रातील नवनाथ अकोलकर, रंभाजी कोळगे, अशोक दिवे, अनिता चिडे, इक्बाल काकर, आदी मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.

बहुजन टायगर फोर्स व कॉलेज स्टॉप मित्र मंडळाच्यावतीने पोलीस उपविभागीय अधीक्षक संदीप मिटके व पोलीस निरीक्षक संजय सानप व भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष प्रकाश आण्णा चित्ते यांच्या शुभहस्ते शाल पुष्पहार व सन्मानचिन्ह देऊन सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आली आहे.

या कार्यक्रमप्रसंगी बेलापूरचे सरपंच महेंद्र साळवी, दत्तनगरचे सरपंच सुनील शिरसाठ, मार्केट कमिटीचे संचालक मनोज हिवराळे, आरपीआयचे राजाभाऊ कापसे, जि. प. सदस्य शरद नवले, गावकरी बँकेचे चेअरमन रावसाहेब वाबळे, भारतीय बौद्ध महासभेचे सुगंधराव इंगळे, परिवर्तन समितीचे अध्यक्ष उत्तमराव दाभाडे, सरिता सावंत, अशोक बागुल, कामगार नेते नागेश सावंत, बेलापूरचे उपसरपंच अभिषेक खंडागळे, सुदर्शन बँकेचे चेअरमन देविदास चव्हाण, किरण लुनिया, अशोकराव दिवे, मिलिंद साळवे, मेजर कृष्णा सरदार, संदिप वाघमारे, सोमनाथ कदम, अर्जुन करपे, सचिन मांडोळे आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता सचिन बनसोडे, गणेश जायगुडे, दादासाहेब बनकर, संजय पीटेकर, गणेश रुपटके, सचिन केदार राहुल हिवराळे, गणेश शेटे, आकाश वाघ, दत्ता पवार, किशोर रोकडे, राजू हरार, सुनील खरात, सतीश हिवराळे, मतीन शहा, मनोज इंगळे, इम्रान बागवान, अशोक खंडागळे, सुधाकर कदम, पप्पू कांबळे, गणेश परदेशी, दीपक जाधव, नितीन जाधव, अर्जुन त्रिभुवन, निलेश गायकवाड, महेंद्र सातदिवे, सनी बनसोडे, राजू दिवे, संजय हिवराळे, सुहास पवार, आदींनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन बाळासाहेब हिवराळे यांनी केले तर आभार बहुजन टायगर फोर्सचे अध्यक्ष संजय रुपटके यांनी मानले.

Related Stories

No stories found.