कौटुंबिक न्यायालयात महिला वकिलांसाठी स्वतंत्र कक्ष

कौटुंबिक न्यायालयात महिला वकिलांसाठी स्वतंत्र कक्ष

अहमदनगर | Ahmednagar

शहरातील जुने जिल्हा न्यायालयात (District Court) सुरु असलेल्या कौटुंबिक न्यायालयात (Family Court) महिला वकिलांसाठी स्वतंत्र बार रूमचा (Separate bar room for women lawyers) प्रारंभ कौटुंबिक न्यायालयाच्या न्यायाधीश नेत्राजी कंक (Family Court Judge Netraji Kank) यांच्या हस्ते झाला.

कौटुंबिक न्यायालयात महिला वकिलांसाठी स्वतंत्र कक्ष
विवाहितेची चिमुकलीसह विहिरीत उडी, मायलेकीच्या आत्महत्येने खळबळ

अहमदनगर वकील संघाचे (Ahmednagar Bar Association) अध्यक्ष अ‍ॅड. भूषण बर्‍हाटे, सेंट्रल बारचे अ‍ॅड. सुभाष काकडे, वकील संघाच्या महिला सचिव अ‍ॅड. मीनाक्षी कराळे, केंद्र सरकारचे अ‍ॅड. सुभाष भोर, विशेष सरकारी वकील अ‍ॅड. सुरेश लगड, अ‍ॅड. शिवाजी कराळे, कार्यकारणी सदस्य अ‍ॅड. सुनिल तोडकर, अ‍ॅड.अनिता दिघे, अ‍ॅड.अनुराधा येवले, अ‍ॅड.वृषाली तांदळे, अ‍ॅड.प्रज्ञा उजागरे, अ‍ॅड.प्रज्ञा हेंद्रे, अ‍ॅड. पल्लवी पाटील, अ‍ॅड.राजेश कावरे, अ‍ॅड.शेलोत, अ‍ॅड.सागर पादीर, अ‍ॅड.अभय राजे, अ‍ॅड.अरुणा राशीनकर, कौटुंबिक न्यायालयाच्या समुपदेशक एस.बी. बिडवे आदी उपस्थित होते.

अहमदनगर बार असोसिएशनने (Ahmednagar Bar Association) न्यायालयाकडे महिला वकिलांकरीत स्वतंत्र वकील कक्ष मिळण्याची मागणी केली होती. यावर उच्च न्यायालयाने जिल्हा न्यायालयांना नुकतेच कौटुंबिक न्यायालयात काम करणार्‍या महिला वकीलांना स्वतंत्र वकील कक्ष मंजूर करण्यात आल्याचे पत्र दिले. त्याप्रमाणे जिल्हा न्यायालयाने अहमदनगर बार असोसिएशनला सदरचे महिलांचे वकील कक्ष वापरण्यास परवानगी दिली आहे. महिला वकिलांना कौटुंबिक न्यायालयात काम करताना स्वतंत्र वकील कक्ष मिळाल्याने महिला वकीलांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

कौटुंबिक न्यायालयाचे न्यायाधीश नेत्राजी कंक यांनी अहमदनगर बार असोसिएशनच्या उपस्थित महिला वकीलांना शुभेच्छा देऊन, स्वतंत्र वकील कक्ष मिळाल्याने यापुढे अधिक चांगले व सुलभ न्यायालयीन कामकाज होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली.

अहमदनगर बार असोसिएशनची महिला वकिलांकरिता स्वतंत्र वकील कक्षाची मागणी उच्च न्यायालय व जिल्हा न्यायालय यांनी पूर्ण केली आहे. कौटुंबिक न्यायालयात काम करण्यास महिला वकिलांना वकील कक्षाचा लाभ होणार आहे. महिला वकील यांना स्वतंत्र वकील कक्ष मिळाल्याने कौटुंबिक प्रकरणे हाताळताना या कक्षात बसून प्रकरणांची तयारी करणे अधिक सुलभ होणार आहे.

- अ‍ॅड.भूषण बर्‍हाटे, अध्यक्ष, वकील संघ.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com