ज्येष्ठ साहित्यिक यशवंतराव गडाख यांना कृतज्ञता पुरस्कार प्रदान

रामकृष्णहरी प्रतिष्ठानचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा
ज्येष्ठ साहित्यिक यशवंतराव गडाख यांना कृतज्ञता पुरस्कार प्रदान

सोनई |वार्ताहर| Sonai

रामकृष्णहरी कृषी प्रतिष्ठानचा प्रा. रामकृष्ण मोरे कृतज्ञता व जीवनगौरव पुरस्कारांचे नुकतेच पुणे येथे वितरण सोहळा पार पडला. या समारंभात ज्येष्ठ साहित्यिक व माजी खासदार यशवंतराव गडाख यांना ‘कृतज्ञता’ पुरस्काराने गौरविण्यात आले. गडाख यांच्यावतीने मुळा एज्युकेशन सोसायटीचे सचिव उत्तमराव लोंढे यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

सोनई येथील कार्यक्रमात पुणेरी पगडी, सन्मानपत्र, व वृक्षारोपांसह हा पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक माजी खासदार यशवंतराव गडाख यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला. यावेळी मुळा एज्युकेशनचे सचिव उत्तमराव लोंढे, श्री ज्ञानेश्वर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गोरक्षनाथ कल्हापूरे, सोनई महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शंकरराव लावरे, उपप्राचार्य डॉ. ज्ञानदेव झिने, प्रशासकीय अधिकारी डॉ. अशोक तुवर, सोनई कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हरी मोरे, बद्रीनाथ काळे, आदी उपस्थित होते.

बालगंधर्व रंगमंदिर पुणे येथे रामकृष्ण मोरे कृतज्ञता व जीवनगौरव पुरस्कारांचे वितरण काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नानासाहेब पटोले अध्यक्षस्थानी असलेल्या या पुरस्कार वितरण सोहळ्यास महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, आमदार संग्राम थोपटे, काँग्रेस शहाध्यक्ष रमेश बागवे, साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, अखिल भारतीय वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील, भू-विकास बँकेचे माजी अध्यक्ष मुरलीधर निंबाळकर, रामकृष्ण हरी कृषी प्रतिष्ठानचे संस्थापक हरी चिकणे, अध्यक्ष उल्हास पवार, उपाध्यक्ष संजय बालगुडे, सचिव मंदार चिकणे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com