साठवणीतील आठवणी पुस्तक कोयटेंनी केलेल्या कामाचा पुरावा- पवार

साठवणीतील आठवणी पुस्तक कोयटेंनी केलेल्या कामाचा पुरावा- पवार

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

महाराष्ट्र राज्य फेडरेशनच्या माध्यमातून काका कोयटे पतसंस्था चळवळ अधिक बळकट करीत असून महाराष्ट्रात पतसंस्था संख्यात्मकदृष्ट्या अधिक असून सहकार खात्याविषयी येणार्‍या विविध अडचणींवर चर्चा करून मार्ग काढावेत आणि वेळप्रसंगी आंदोलने, मोर्चे काढावेत. माझे सतत काका कोयटे आणि त्यांच्या राज्य फेडरेशनला सहकार्य असेल. तसेच महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्षपद भूषवित असताना काका कोयटे यांनी कौतुकास्पद कामगिरी केली असून साठवणीतील आठवणी हे पुस्तक त्यांनी केलेल्या कामाचा पुरावा आहे. असे गौरवोद्गार ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी काढले.

महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे यांचा अध्यक्षीय कारकिर्दीचा प्रवास दाखविणारे साठवणीतील आठवणी या पुस्तिकेचे प्रकाशन ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी प्रतापराव पवार, महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर, महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे, अहमदनगर जिल्ह्य स्थैर्य निधीचे अध्यक्ष व श्री साईबाबा संस्थानचे विश्वस्त सुरेश वाबळे, शांतीलाल सिंगी, सुदर्शन भालेराव, सुरेखा लवांडे तसेच राज्य फेडरेशनचे पदाधिकारी, पतसंस्था चळवळीतील पदाधिकारी उपस्थित होते. सदर पुस्तकाविषयी शरदचंद्र पवार यांना राज्य फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे यांनी माहिती दिली असता फेडरेशनच्या अध्यक्षांसह सर्व पदाधिकार्‍यांना पतसंस्थांना येणार्‍या अडचणींवर तोडगा काढण्यासाठी दिल्लीला येण्याचे आमंत्रण दिले.

Related Stories

No stories found.