ज्येष्ठ पत्रकार अशोक सदाफळ यांचे निधन

ज्येष्ठ पत्रकार अशोक सदाफळ यांचे निधन

अस्तगाव (वार्ताहर)

राहाता येथील दैनिक सार्वमतचे तालुका प्रतिनिधी अशोकराव कारभारी सदाफळ (वय 52) यांचे शनिवारी दुपारी अल्पशा आजाराने निधन झाले.

सदाफळ निर्भिड आणि परखड लिखान करत. राहाता तालुकाच नव्हे तर जिल्हाभरात त्यांचा जनसंपर्क होता. तरुण वयात त्यांनी नाशिकच्या दैनिक गावकरीतून पत्रकारितेला सुरुवात केली. दैनिक सामनाचेही ते तालुका प्रतिनिधी होते.

दैनिक सार्वमतमध्ये आपल्या परखड लिखाणातून शिर्डी, राहाता तालुक्यातील अनेक प्रश्नांना त्यांनी वाचा फोडली. राहाता शहर परिसरातुन, राहाता तालुक्यातील, ग्रामीण भागातील सर्वसामान्यांच्या शेतकर्‍यांच्या विवंचना सार्वमतमध्ये मांडून त्या सोडविण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला. राहाता भागातील पेरु उत्पादकांच्या समस्या, पाणी प्रश्‍न, नागरिकांचे मुलभूत प्रश्नासाठी पत्रकारिता केली. आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातुन सर्वांवरच त्यांचा वचक होता. राहाता तालुक्यातील पत्रकारिता क्षेत्राला त्यांच्या जाण्याने धक्का बसला आहे. त्यांच्या पश्‍चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, भाऊ भाऊसाहेब, सुभाषराव, सुखदेव या बंधुसह पुतणे, पुतण्या असा मोठा परिवार आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com