अहमदनगर (प्रतिनिधी) -

काँग्रेसचे जुन्या पिढीतील निष्ठावान कार्यकर्ते आर. आर. उर्फ राम पिल्ले यांचे अल्पशा आजाराने निधन

झाले. कै. पिल्ले हे भिंगार काँग्रेसचे संस्थापक सदस्य होते. त्यांनी युवक काँग्रेसमध्ये सक्रिय सहभाग घेतला. त्यांनी माजी खा. व ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्याबरोबर कॉलेज जीवनात अनेक चळवळी केल्या.

वडील स्वातंत्र्यसैनिक असल्यामुळे त्यांचाच वारसा त्यांनी पुढे चालविला. सरोज टॉकिज बॉम्ब हल्याच्या स्मृती त्यांनी जनजागृतीतून सातत्याने जागत्या ठेवल्या. भिंगार कॅन्टोन्मेंट बोर्डावर ते अनेकदा निवडून आले होते. नंतर त्यांनी उपाध्यक्षपदही भूषविले.

वकिलीत राहून माळीवाड्यातील रूपवते बोर्डींगचे काम पाहिले. नोटरीपद भूषविले. सलग 15 वर्षे भिंगार कॉग्रसचे अध्यक्षपद त्यानी भूषविले. त्यांच्या निधनाबद्दल मंत्री बाळासाहेब थोरात, आ. सुधीर तांबे, माजी मंत्री राधाकृष्ण विखे, माजी आमदार शिवाजीराव कर्डिले, खा. सुजय विखे आदींनी दुःख व्यक्त केले.