ज्येष्ठ नागरिकांना रेल्वे सवलत बंद; जिल्ह्यातील खासदारांनी लक्ष घालावे

ज्येष्ठ नागरिकांना रेल्वे सवलत बंद; जिल्ह्यातील खासदारांनी लक्ष घालावे

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

करोना प्रादुर्भावच्या नावाखाली भारतीय रेल्वेकडून ज्येेष्ठ नागरिकांना रेल्वे प्रवासात मिळणारी प्रवास भाडे सवलत मार्च 2020 नंतर रद्द करण्यात आली आहे. काही रेल्वेगाड्या बंद केल्या होत्या. सध्या करोना प्रादुर्भाव कमी झाल्याने जवळपास सर्व गाड्या सुरु झाल्या आहेत. तसेच अनेक नवीन गाड्या सुरु करण्यात आल्या आहेत. खासदारांनी हा प्रश्न केंद्रात मांडून रेल्वे प्रवासाची सवलत पूर्ववत सुरु करावी, अशी मागणी ज्येेष्ठ नागरिकांकडून करण्यात येत आहे.

मोदी सरकारच्या काळात अच्छे दिन येणार अशी संकल्पना होती. पण सरकारमधील मंत्रीच असा अन्याय करीत असतील तर दाद कोठे मागायची? ज्येेष्ठ नागरिकांची, त्यांच्या आरोग्याची व पुढील जीवनाची देखभाल करणे ही समाजाची, सरकारची जबाबदारी असते. पण प्रवास सवलत रद्द करण्यात आल्याचे रेल्वे मंत्र्यांनी सांगितले, ती का रद्द करण्यात आली, त्याचा खुलासा मात्र देण्यात आला नाही. अनेक वृद्धांना चालण्याचा, बोलण्याचा त्रास आहे.

यामुळे प्रवास करणार्‍या वृद्ध प्रवाशांची संख्या कमी आहे. 80 टक्के लोकांना गुडघ्याचा त्रास सुरु आहे. रेल्वे प्रवास भाडे सवलत रद्द झाल्याने वाढत्या तिकीट भाड्यामुळे सहलीला जाणे, तीर्थक्षेत्रांना जाणे, उपचारासाठी दूर जाणे आदी बाबींवर परिणाम झाला आहे. त्यामुळे पूर्वी ठेवलेल्या सवलती सुरु कराव्यात, प्रत्येक खासदार, आमदार यांनी केंद्रात, राज्यात आवाज उठवून वृद्ध ज्येष्ठ नागरिक, खेळाडू यांना रेल्वे प्रवास सवलत मिळवून द्यावी, अशी अशी मागणी केली जात आहे.

खासदार. पूर्व खासदार, तसेच आमदार यांना रेल्वे मोफत सेवा देते. शासन मोफत निवास, मोबाईल, दूरध्वनी सेवा, गाडीसाठी पेट्रोल डिझेल, मोफत वैद्यकीय सेवा दिली जाते. त्याचप्रमाणे त्यांना वेतन व आजीवन पेन्शन दिली जाते. हा खर्च जनतेकडून विविध मार्गाने वसूल केला जातो. आमदार खासदारांसाठी सरकारला आर्थिक बोजा पडत नाही का? मग वयोवृद्ध, पेन्शनधारकावर अन्याय का? त्यांना का भाडे सवलत नाही? असा सवाल ज्येेष्ठ नागरिक करीत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com