काळजी घ्या! सूर्य काेपला; उष्माघाताने वृद्धाचा मृत्यू

काळजी घ्या! सूर्य काेपला; उष्माघाताने वृद्धाचा मृत्यू

रांजणखोल | वार्ताहर

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील उकाडा (Heat) वाढत चालला आहे. यामुळे राज्यातील तापमान चांगलेच (Temperature rise) वाढले आहे. उन्हामुळे लाहीलाही होत असल्यामुळे अनेकांनी घराबाहेर पडणेही बंद केल्याचे दिसत आहे. अशातच एकाचा वृद्ध व्यक्तीचा उष्माघाताने (Sunstroke) मृत्यू झाल्याचे पुढे आले आहे.

श्रीरामपूर-संगमनेर रोडवरील (Shrirampur-Sangamner Road) महाबीज खंडाळा (Mahabij Khandala) येथे उष्माघाताने एका वृद्ध व्यक्तीचा बळी गेला आहे. सादर मृत व्यक्तीच्या खिशात वरील फोटो सापडला असल्याची माहिती टिळकनगर पोलीस स्टेशनच्या वतीने देण्यात आली आहे. मात्र मृत व्यक्तीची ओळख अजून पटलेली नाही.

Related Stories

No stories found.