सुगंधी तंबाखू विक्रीप्रकरणी एकाला अटक

पोलीसांनी हस्तगत केला 28 हजारांचा मुद्देमाल
सुगंधी तंबाखू विक्रीप्रकरणी एकाला अटक

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

नगर एलसीबी पोलिसांनी (LCB Police) भिंगारमध्ये छापा (Bhingar Raid) टाकून सुगंधी तंबाखू विक्री प्रकरणी (Selling Fragrant Tobacco) एकाला अटक (Arrested) केली आहे. साजित हमीद पठाण (वय 42 वर्षे रा. झेंडीगेट, नालसाब चौक, नगर) असे अटक (Arrested) केलेल्याचे नाव आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके (LCB Pi Anil Katke) यांना मिळाल्या खबरीवरून ही छापेमारी (Raid) करण्यात आली.

भिंगार बाजारच्या पाठीमागे आर्मी रोडलगत काचचे गोडवाऊनच्या शेजारी एका पत्र्याच्या शेडमध्ये पठाण हा महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंध असलेली सुगंधी तंबाखुची विक्री (Selling Fragrant Tobacco) करण्याच्या उद्देशाने साठवणूक करुन ठेवली होती. पोलीस हवालदार दिनेश मोरे, नाईक कमलेश पाथरूट, पोलीस नाईक शंकर चौधरी, नाईक योगेश सातपुते यांच्या पथकाने आर्मी रोडलगत काचचे गोडवाऊनच्या शेजारी एका पत्र्याच्या शेडमध्ये छापा टाकला.

साजित हमीद पठाण याला ताब्यात घेत 12 हजार 400 रूपयांची रत्ना छाप, 300 तंबाखुचे 20 बॉक्स, 15 हजार 120 रूपयांचा प्रीमियम रत्ना छाप 300 तंबाखुचे 40 बॉक्स असा 27 हजार 520 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. स्थानिक गुन्हे शाखेचे हवलादार मोरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भादवि कलम 188 , 272 , 273 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास भिंगार पोलिस स्टेशनचे पोलीस हेडकॉन्स्टेबल जालिंदर आव्हाड करत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com