सेल्फी पॉईंटमुळे राहुरीचे सौंदर्य खुलले- डॉ. सौ. तनपुरे

सेल्फी पॉईंटमुळे राहुरीचे सौंदर्य खुलले- डॉ. सौ. तनपुरे

राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri

राहुरी नगरपालिकेच्या वतीने नगरपालिका कार्यालयाजवळ अतिशय आकर्षक असा सेल्फीपॉईंट तयार करण्यात आला आहे. यामुळे शहराच्या सौंदर्यात भर पडणार असल्याचे माजी नगराध्यक्षा डॉ. सौ. उषाताई तनपुरे यांनी सांगितले.

राहुरी नगरपालिकेच्या वतीने उभारण्यात आलेल्या सेल्फीपॉईंटचे उदघाटन माजी खासदार प्रसाद तनपुरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष अनिल कासार, नगरसेवक सूर्यकांत भुजाडी, नंदकुमार तनपुरे, सौ. संगीता आहेर, उपनगराध्यक्षा सौ. नंदा उंडे, श्रीमती सुमती सातभाई, विलास तनपुरे, अशोक आहेर, विजयसिंह येवले, मुख्याधिकारी डॉ. सचिन बांगर उपस्थित होते.

माझी वसुंधरा या अभियांनांतर्गत शहरात काही ठिकाणी अशा प्रकारचे सेल्फी पॉईंट उभारण्यात येणार असून आजच्या या काळात अशा पॉईंटची गरज निर्माण झाली आहे. प्रत्येकाने पर्यावरणाचे संरक्षण करण्याची जबाबदारी ही सर्वांची असून प्रत्येकाने आपला खारीचा वाटा उचलला पाहिजे. प्रदूषण कमी करण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे डॉ. सौ. तनपुरे यांनी सांगितले.

राहुरी नगरपालिकेच्या वतीने काल सकाळी युवतीची सायकल रॅली काढली होती. त्या सायकल रॅलीत शहरातील 75 मुलींनी सहभाग घेतला. सायकल रॅलीस उपस्थितांनी हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ केला. रॅलीत लहान मुली सहभागी झाल्या.

सहभागींना पालिकेच्या वतीने सौ. तनपुरे यांच्या हस्ते प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. तसेच उपस्थितांना पर्यावरण संवर्धनाची हरित शपथ देण्यात आली. यावेळी कार्यालयीन अधीक्षक महेंद्र तापकीरे, पालिका अभियंता स्वप्नील काकड, स्वच्छता अभियानचे प्रमुख सुभाष बाचकर, वृक्षसंवर्धन समितीचे शंकर आगलावे, आरोग्य विभाग प्रमुख राजेंद्र पवार, सुनील कुमावत, राजेंद्र जाधव, अर्जुन बर्गे, विजय धनेरधर, सुधीर वैद्य, भाऊसाहेब हिंगे, सर्व नगरपरिषद कर्मचारी उपस्थित होते. सुनील फडके यांनी सूत्रसंचालन केले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com