श्रीसंत कवी महिपती महाराज देवस्थानच्या विश्‍वस्तपदी राजेंद्र साबळे यांची निवड

श्रीसंत कवी महिपती महाराज देवस्थानच्या विश्‍वस्तपदी राजेंद्र साबळे यांची निवड

ताहाराबाद (वार्ताहर) - श्रीसंत कवी महिपती महाराज देवस्थान विश्‍वस्त मंडळावर राजेंद्र साबळे यांची एकमताने विश्‍वस्त म्हणून निवड करण्यात आली.

तत्कालीन अध्यक्ष रावसाहेब साबळे यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेवर राजेंद्र साबळे यांची वर्णी लागली. देवस्थानचे ज्येष्ठ विश्‍वस्त आसाराम ढूस यांनी सूचना मांडून व्यवस्थापक विश्‍वस्त बाबासाहेब वाळुंज यांनी त्यास अनुमोदन दिले.

सन 1986 पासून रावसाहेब साबळे विश्‍वस्त मंडळावर अध्यक्ष म्हणून कामकाज करत होते. साबळे यांच्या निधनाने देवस्थानची मोठी हानी झालेली आहे. यावेळी त्यांना श्रद्धांजली समर्पित करण्यासाठी देवस्थान विश्‍वस्त, राहुरी तालुक्यातील, परिसरातील व ताहाराबाद गावातील वारकरी उपस्थित होते. देवस्थानचे उपाध्यक्ष अविनाश कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्यामध्ये स्व. साबळे यांनी केलेल्या विकासाचा आलेख मांडण्यात आला.

देवस्थानचे न्यू इंग्लिश स्कूल या विद्यालयाला स्वर्गीय रावसाहेब पाटील साबळे विद्यालय ताहाराबाद असे नाव देण्याचा प्रस्ताव पारित करण्यात आल्याचे ज्येष्ठ विश्‍वस्त आसाराम ढूस यांनी सांगितले. यावेळी विश्‍वस्त, ग्रामस्थ तसेच वारकर्‍यांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. त्यामध्ये आसाराम ढूस यांनी देवस्थानचा प्रारंभीपासून विकासाचा आलेख मांडला.

यावेळी नारायण झावरे, बाळकृष्ण बानकर, सुरसिंग पवार, राजू चव्हाण, शिवाजी कोळसे, धनराज जगताप, अशोक किनकर, रमेश नालकर, मच्छिंद्र कोहकडे, शिवाजी बंगाळ, सुभाष शिरसाठ, शिवशाहीर विजय तनपुरे, संजय कांबळे, बाळकृष्ण महाराज कांबळे, नाना महाराज गागरे, चांगदेव महाराज जाधव, बाळकृष्ण महाराज खांदे, संपत महाराज जाधव, दिलीप महाराज बिडवे, सीताराम झावरे, अश्‍विनी घोरपडे, गिताबाई लोखंडे, आदींनी साबळे यांना श्रद्धांजली समर्पित केली. प्रास्ताविक देवस्थानचे सचिव बाळासाहेब मुसमाडे यांनी केले तर सूत्रसंचालन बाबासाहेब वाळुंज यांनी केले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com