28 गुन्ह्यातील आरोपींकडून 77 लाखांचा मुद्देमाल जप्त

पुणे ग्रामीण गुन्हे अन्वेषण विभागाची मोठी कामगिरी
28 गुन्ह्यातील आरोपींकडून 77 लाखांचा मुद्देमाल जप्त

शिरूर (तालुका प्रतिनिधी) - नगर,सोलापूर पुणे, जिल्ह्यातील शिरूर तालुक्यासह पारनेर, श्रीगोंदा, आंबेगाव, जुन्नर, नारायणगाव खेड, धुडगूस घालणारी सराईत चोरट्यांच्या चार जणांच्या टोळीच्या पुणे ग्रामीण गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या पथकाने शिरूर येथून मुसक्या आवळत 28 गुन्हे उघडीस आणून दहा ट्रॅक्टरसह 77 लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे.

सतीश राक्षे,( रा. बेलवंडीफाटा, ता. श्रीगोंदा, सध्या राजमाता बिल्डींग, बाबुरावनगर, शिरूर, जि.पुणे), ज्ञानदेव विनायक नाचबोणे, (रा.रम्यनगरी कॉलनी, धनु झेंड यांचे बिल्डींगमध्ये, शिरूर, जि. पुणे, प्रविण कैलास कोरडे, (मुळ रा. बोरी, ता. जुन्नर, जि. पुणे, सध्या रा. राजमाता बिल्डींग, बाबुरावनगर, शिरूर, जि. पुणे), व सुनिल देवकाते, (रा. इरले, जि. सोलापूर) या टोळीला अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून 28 गुन्हे उघडीस आले आहेत. निरीक्षक घनवट यांनी दिलेली माहिती नुसार नगर सोलापूर व पुणे जिल्ह्यातील शिरूर, आळेफाटा, नारायणगाव, खेड, मंचर, बेलवंडी, जुन्नर, पारनेर, बार्शी या तालुक्यातील शेतकर्‍यांचे ट्रॅक्टर चोरीचे बरेच गुन्हे घडत होते. शेतकरी वर्ग त्रस्त झाला होता.

दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखा पथकास गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली, शिरुर शहरात राहणारे राक्षे, नाचबोणे व कोरडे हे तिघेही एकत्रात फिरतात ते कोणताही कामधंदा करीत नसून त्यांचेकडे वेगवेगळया ट्रॅक्टर, पिकअप अशा गाडया आणतात त्या चोरीच्या असाव्यात अशी माहीती गोपनीय बातमीदाराकडून मिळाल्याने पुणे विभागाच्या पथकाने राक्षे यास ताब्यात घेतले. त्यानंतर त्याने नाचबोणे आणि कोरडे, देवकाते यांची नावे सांगितली.

या सर्वांनी28 ठिकाणी चोर्‍या केल्या असल्याची माहीती सांगितली त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखा पथकाने एकुण 76 लाख 88 हजार किंमतीचे 10 ट्रॅक्टर, 2 पिकअप, 1 बोलेरो जिप, 1 स्कॉपीओ, 6 मोटार सायकल, ऑक्सिजन सिलेंडर, घरगुती गॅस सिलेंडर, गॅस कटर, 5 गायी, नट बोल्ट खोलावयाचे पाने असा मोठा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे आरोपींनी शिरूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक प्रवीण खानापुरे करीत आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com