अहमदनगर (प्रतिनिधी) -

रेशनचा तांदूळ काळ्या बाजारात घेऊन जाणारा ट्रक नगर तालुका पोलिसांनी पकडला. 10 लाख रुपये किंमतीच्या ट्रकसह 7 लाख रुपये

किंमतीचा तांदूळ असा 17 लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. नगर- पुणे रोडवरील अरणगाव (ता. नगर) बायपास जवळ पोलिसांनी ही कारवाई केली.

याप्रकरणी गोविंद विद्यासागर वाघमारे, राहुल भगवान घोरपडे (दोघे रा. कलांडी ता. निलगा जि. लातूर) यांच्याविरूद्ध तालुका पोलीस ठाण्यात जीवनावश्यक वस्तू कायद्यान्वये गुन्हा दाखल केला असून त्यांना पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस नाईक अशोक मरकड यांनी फिर्याद दिली आहे. रेशनचा तांदूळ काळ्या बाजारात घेऊन जाणारा ट्रक नगरमधून जाणार असल्याची माहिती तालुका पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक राजेंद्र सानप यांना मिळाली होती. निरीक्षक सानप यांनी आपल्या पथकासह अरणगाव शिवारात सापळा लावला. ट्रक येताच त्याला अडविले. ट्रकची तपासणी केली असता यामध्ये तांदूळ आढळून आला. सदरचा तांदूळ कर्नाटकमधून भरून राजस्थान येथे घेऊन जात असल्याची माहिती ट्रक चालकाने पोलिसांना दिली आहे. मात्र ट्रक लातूर जिल्ह्यातील असल्याने तांदूळ कुठे भरला याबाबत पोलीस तपास करीत असल्याची माहिती निरीक्षक सानप यांनी दिली.