प्रत्येक गावात सीड बँक निर्माण झाली पाहिजे-राहिबाई पोपेरे

प्रत्येक गावात सीड बँक निर्माण झाली पाहिजे-राहिबाई पोपेरे

तळेगाव दिघे |वार्ताहर| Talegav Dighe

आपण आपली संस्कृती विसरतोय. आपण निसर्गाला विसरलो. चांगले जीवन जगण्यासाठी प्रत्येकाने आपली संस्कृती जपावी. मी फक्त निसर्गाची शाळा शिकलेय. प्रत्येक गावात सीड बँक निर्माण झाली पाहिजे, असे प्रतिपादन बीज माता पद्मश्री राहीबाई पोपेरे यांनी केले.

संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे येथे साईबाबा रुग्णालयातर्फे कोरोना काळात अतुलीय कार्य करणार्‍या कोरोना योद्ध्या महिलांच्या पुरस्कार प्रदान कार्यक्रमात त्या बोलत होत्या. प्रसंगी संगमनेरच्या माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर कांदळकर, सरपंच बाबासाहेब कांदळकर, प्राचार्य एच. आर. दिघे, छत्रपती प्रतिष्ठाणचे कार्याध्यक्ष सचिन दिघे, डॉ. नंदकुमार गोडगे, वाळीबा महाराज भागवत संपत दिघे, ज्ञानेश्वर सानप, विठ्ठल दिघे, बी. सी. दिघे, मच्छिंद्र दिघे, गणेश दिघे, लक्ष्मण दिघे, साहेबराव जोर्वेकर, सागर भागवत, विलास जोर्वेकर, राजेंद्र कहाडंळ, रामदास दिघे, शरद भागवत, आरिफ शेख, आदित्य घाडगे, सचिन उगले, नंदू शिंदे, अतुल कदम सहित पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

याप्रसंगी दुर्गाताई तांबे, प्रभाकर कांदळकर, सरपंच बाबासाहेब कांदळकर, प्राचार्य एच. आर. दिघे, सचिन दिघे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रसंगी बीज माता पद्मश्री राहीबाई पोपेरे यांच्या हस्ते डॉ. गोडगे तसेच कोरोना काळात अतुलीय कार्य करणार्‍या कोरोना योद्ध्या महिलांचा समाजसेवक पुरस्कार देवून गौरव करण्यात आला. प्रास्ताविक डॉ. नंदकुमार गोडगे यांनी केले. सूत्रसंचालन शरद महाराज ढवळे यांनी केले.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com