‘माध्यमिक’ ला 13 कोटी 29 लाखाचा निव्वळ नफा

अध्यक्ष मिसाळ || 8 मे ला वार्षिक सभा
‘माध्यमिक’ ला 13 कोटी 29 लाखाचा निव्वळ नफा

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

माध्यमिक शिक्षक सोसायटीस 13 कोटी 29 लाखाचा निव्वळ नफा झाला असल्याची माहिती सोसायटीचे अध्यक्ष सुरेश मिसाळ यांनी दिली. सुमारे 12 हजार शिक्षक हजार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सभासद असलेल्या माध्यमिक शिक्षक सोसायटीस गेल्या आर्थिक वर्षात 7 टक्के दराने 871 कोटीचे कर्ज वाटप केले असून सर्व आवश्यक त्या तरतुदी करुन 13 कोटी 29 लाख इतका निव्वळ नफा मिळवला आहे.

दरम्यान, संस्थेची 79 वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दिनांक 8 मे रोजी दुपारी नंदनवन लॉन येथे होत असून, संचालक मंडळाने 10 टक्के दराने लाभांश देण्याचे सुचविले आहे, अशी माहिती अध्यक्ष मिसाळ यांनी दिली. संस्थेच्या ठेवी मध्ये आर्थिक वर्षात 58 कोटींची वाढ होऊन 737 कोटीवर पोहोचलेल्या आहेत संचालक मंडळाने संस्थेच्या कर्ज वाटपात 2 लाखांची वाढ सुचविली असून आता एका सभासदास 21 लाख 15 हजार कर्ज मिळेल. कृतज्ञता निधीमध्ये 3 हजाराची वाढ सुचविल्याने यावर्षी सेवानिवृत्त सभासदांना कृतज्ञता निधीमधून 17 हजार 500 देण्यात येतील अशी माहिती संस्थेचे उपाध्यक्ष आण्णासाहेब ढगे यांनी दिली.

कोविड काळात संस्थेचे जवळपास 72 सभासद मयत झाल्याने संस्थेने मयत सभासद कर्ज निवारण निधीमध्ये 100 रुपयांची वाढ सुचविली आहे. या वर्षापासून सेवानिवृत्त सभासदांना 17 हजार 500 कृतज्ञता निधी बरोबर आणखी जास्तीचे 5 हजार नफ्यातून देण्याचे संस्थेने ठरविले आहे. त्यामुळे या वर्षी सेवानिवृत्त होणार्‍या सभासदांना कृतज्ञता निधी 22 हजार 500 संस्थेकडून मिळतील, असे संस्थेचे ज्येष्ठ संचालक भाऊसाहेब कचरे यांनी सांगितले.

पुरोगामी कन्यादान-भाग्यलक्ष्मी योजनेअंतर्गत लग्नासाठी विना परतावा 15 हजार अपंग सभासदास व्याजात 1 टक्के सवलत देशसेवेचे कर्तव्य बजावत जिल्ह्यातील जवानास वीर मरण प्राप्त झाल्यास रुपये 51 हजारांची मदत दिली जाते. अशा विविध योजनांची सभासदांनी केलेल्या सहकार्यामुळे यशस्वीपणे अंमलबजावणी होत असल्याने पगारदार सेवकांत ही संस्था जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात पथदर्शी म्हणून ओळखले जाते. यावेळी सचिव स्वप्निल इथापे संचालक खेमनर चांगदेव, काळे ज्ञानेश्वर, घुले काकासाहेब, डावखर सूर्यकांत, म्हस्के धनंजय, काटे दिलीप, ठुबे अशोक, कोळसे संजय, थोरे सत्यवान, गायकर अनिल, रहाणे कैलास, राक्षे धोंडीबा, खुळे उत्तम, वडवकर अजित, कराळे आशा श्रीमती म्हस्के मनिषा आदी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.