माध्यमिक शिक्षक सोसायटीकडून सभासदांना 17 कोटींचे वाटप

माध्यमिक शिक्षक सोसायटीकडून सभासदांना 17 कोटींचे वाटप

अस्तगाव |वार्ताहर| Astgav

12 हजार सभासद असलेल्या अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक सोसायटीने सभासदांना कायम ठेवीवरील व्याज व वर्गणीवरील व्याज दिले आहे. 17 कोटी रुपये या सभासदांच्या खाती वर्ग करण्यात आले आहेत. गेल्या दोन महिन्यांपासुन शिक्षकांचे पगार रखडल्याने आर्थिक अडचणीत असलेल्यांना यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.

माध्यमिक शिक्षक सोसायटी दरवर्षी वार्षिक सभेनंतर ठेवीवरील व्याज, वर्गणीवरील व्याज व डिव्हीडंडचे वाटप करत असते. हे साधरणत: जूनमध्ये वाटप होते. परंतु गेल्या वर्षी कोव्हिडमुळे वार्षिक सभा वेळेत घेता न आल्याने काही काळानंतर ते वाटप करण्यात आले. मात्र यावर्षीही सर्वसाधारण सभा कधी होईल हे अनिश्चित असल्याने सोसायटीच्या संचालक मंडळाने ठरावाद्वारे ठेवीचे व्याज व वर्गणीचे व्याज देण्याचा निर्णय घेतला व सर्वसाधारण सभेच्या अगोदर देण्यात आले. आर्थिक वर्ष संपल्याबरोबरच सोसायटीने सभासदांच्या बँक खाती ठेवीवरील व्याज व वर्गणीवरील व्याज वेळेत वर्ग केले.

शिक्षकांचे पगार मार्च अखेरमुळे रखडतात. याशिवाय एनपीएसच्या पुर्ततेमुळे व काहींचे फेब्रुवारीपासुन पगार रखडले आहेत. शिक्षक आर्थिक अडचणीत असताना माध्यमिक शिक्षक सोसायटीने व्याजाची रक्कम सभासदांच्या खाती वर्ग केल्याने सभासद असलेल्या शिक्षक तसेच शिक्षकेतर सेवकांना आधार मिळाला आहे.

सभासदांना ठेवीवरील व वर्गणीवरील व्याज 5.71 टक्के प्रमाणे काढून माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या मुख्य शाखेसह 13 शाखंमधून सभासदांच्या खाती वर्ग करण्यात आले आहे. यामुळे आर्थिक चणचण दूर होण्यास मदत झाल्याने सर्व संचालक मंडळाचे सभासदांनी आभार मानले आहे.

जेष्ठ संचालक प्रा. भाऊसाहेब कचरे यांच्या नेतृत्वाखालील संचालक मंडळाने अनेक योजना सभासदांच्या हिताच्या राबविल्या आहेत. या योजनांची राज्यभर चर्चा होत आहे. सभासदांना देण्यात येणारे कर्जाचा व्याजदरही 18 टक्क्यांवरुन अगदी कमी करत 8 टक्क्यांवर आणला आहे. कोव्हिड आणि मार्च अखेरमुळे पगार उशीरा होतात. काही शाळांचे 2 महिन्यांपासुन पगार नाही. सोसायटीचे अध्यक्ष चांगदेव खेमनर, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर काळे व संचालक मंडळाने निर्णय घेवुन वार्षिक सभेपुर्वीच ठेवीवरील व वर्गणीवरील व्याज सभासदांच्या बँक खाती वर्ग केले.

- पुंडलिक बोठे, तज्ञ संचालक, माध्यमिक शिक्षक सोसायटी

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com