अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagarजिल्हाधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आलेल्या गौण खनिज परवान्यांस मुदतवाढ देण्याचा निर्णय महसूल विभागाने घेतला आहे..या निर्णयामुळे वाळू, दगड खाणमालक, मुरूम, स्टोन क्रशरधारक, डम्परमालकांना दिलासा मिळाला आहे. करोनाच्या संकटामुळे बांधकाम क्षेत्रावर अनिष्ट परिणाम झाला आहे. त्यामुळे या क्षेत्राला साहित्य पुरवठा करणारी यंत्रणा बर्याच अंशी प्रभावित झाली आहे. त्युळे गौणखनिज उत्खनन व वाहतुकीस देण्यात आलेल्या परवान्यांच्या अनुषंगाने हा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्राच्या नगर विकास व गृहनिर्माण मंत्रालयामार्फत अधिसूचनेनुसार आपत्कालीन परिस्थितीत संबंधित प्राधिकरणांनी मंजुरी दिलेल्या परवानग्या, अनुज्ञप्त्या, नाहरकत प्रमाणपत्रे, बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्रे, भोगवटा प्रमाणपत्रे, प्राधिकरणाकडे जमा करावयाचे शल्क आदिची वैधानिक मुदत आपोआप 6 महिन्यांनी वाढवण्याचा विचार करावा असे निर्देश दिले आहेत. त्यानुसार राज्य शासनाच्या नगर विकास विभागामार्फत परिपत्रकानुसार बांधकाम परवानगीसाठी आवश्यक असणार्या विविध परवाने, ना हरकत प्रमाणपत्र, चालान इत्यादीसाठी 9 महिन्यांची मुदतवाढ दिलेली आहे..परिपत्रकात काय म्हटलयं.. केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सुचनांच्या आधारे जिल्हाधिकारी अथवा त्यांचे अधिनस्त कार्यालयामार्फत बांधकाम व्यावसायिकांना दिलेल्या गौण खनिज उत्खनन परवानासाठीची मुदतदेखील 6 महिन्यांसाठी वाढविणे आवश्यक आहे. त्यानुसार 25 मार्च, 2020 नंतर मुदत संपणार्या परवान्यासाठी उत्खनन व वाहतूक पूर्ण झाले नसल्यास यापुढे पुढील 6 महिन्यांच्या कालावधीसाठी मुदत वाढविण्यात येत आहे. या वाढीव 6 महिन्यांच्या कालावधीतही उपरोक्त कारणास्तव अप्रत्याशित आपत्कालीन परिस्थितीमुळे निर्माण झालेली असंभवता विचारात घेऊन, दिलेल्या परवान्यांप्रमाणे बांधकाम व्यावसायिक उत्खनन व वाहतूक पूर्ण न करू शकल्यास योग्य त्या कारणांची नोंद घेऊन आणखी पुढील 3 महिने मुदतवाढ देण्याबाबत जिल्हाधिकार्यांनी कार्यवाही करावी असे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.