कोपरगावच्या दुय्यम निबंधक कार्यालयात कर्मचार्‍यांसह अधिकार्‍यांची मनमानी

कोपरगावच्या दुय्यम निबंधक कार्यालयात कर्मचार्‍यांसह अधिकार्‍यांची मनमानी

कोपरगाव |तालुका प्रतिनिधी| Kopargav

लॉकडाऊनच्या काळात सामान्य नागरिकांना अनेक कामांना विलंब झाला. मात्र आता सर्व व्यवहार पूर्ववत झालेले आहेत. मात्र निबंधक कार्यालयातील दुय्यम निबंधक हे श्रेणी 1 चे अधिकारी सकाळी 11:30 ला येतात तर दुपारी 4 वाजताच त्यांच्या दालनातून निघून जातात. यामुळे नागरिकांना मोठा मनःस्ताप सहन करावा लागत आहे.

बुधवारी दुपारी 4 वाजता दुय्यम निबंधक श्रेणी 1 चे अधिकारी दिलीप निर्‍हाळी त्यांच्या दालनात उपस्थित नव्हते. त्यांच्या दालनातील चार पंखे आणि चार दिवे सुरू होते. विजेचा अपव्यय होत होता.

या ठिकाणी कोणालाही बंधने नसल्याने सेवेबाबत नागरिकांच्या तक्रारीत मोठ्या प्रमणात वाढ झाली आहे. संवेदनशील काळात कर्तव्यावर वेळेत उपस्थित राहून तक्रारींचा निपटारा करणे, शिस्त लावणे हे ज्यांचे प्रमुख कर्तव्य आहे, तेच बड्या पगाराचे अधिकारी 11 वाजेपर्यंत कार्यालयात पोहोचले नसतात हे वास्तव उघड झाले. दुय्यम निबंधक कार्यालयातील अधिकारी कर्मचार्‍यांची कार्यालयीन वेळ सकाळी 9.45 ते सायंकाळी 6.15 अशी आहे.

दुय्यम निबंधक, शिपाई आणि क्लार्क या पोस्ट असून दुय्यम निबंधकच वेळेवर कधीही कार्यालयात उपस्थित नसतात. तसेच पूर्ण वेळ कार्यालयात थांबत नाही.

वीज ही राष्ट्रीय संपत्ती आहे. त्याची बचत करा, असा संदेश देणार्‍या शासनाचे वरिष्ठ अधिकार्‍यांच्या दालनातील पंखे, विजेचे दिवे ते अनुपस्थित असतानाही सुरूच असतात.

दुपारी ‘लंच टाईम’ वगळता सकाळी 9.45 ते सायंकाळी 6.15 वाजेपर्यंत कर्तव्यावर हजर असणे सर्व अधिकारी कर्मचार्‍यांना बंधनकारक आहे. वेळेवर अधिकारी कार्यालयात पोहोचत नसतील तर नागरिकांची कामे होणार कशी? अधिकारी नेहमीच कार्यालयात उशिरा येत असल्याने सामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com