दुसर्‍या दिवशी 15 हजार विद्यार्थ्यांची शाळेत हजेरी

आठवी ते बारावीचे वर्ग : 151 शाळा भरल्या
दुसर्‍या दिवशी 15 हजार विद्यार्थ्यांची शाळेत हजेरी

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

दीड वर्षापासून करोनाच्या (covid 19) प्रादुर्भावामुळे बंद असणार्‍या शाळा (School) आता हळूहळू सुरू होत आहे. राज्य सरकारने (State Government) आठवी ते बारावीपर्यंत शाळा (वर्ग) सुरू करण्यास परवानगी दिल्यानंतर नगर जिल्ह्यात (Ahmednagar District) दुसर्‍या दिवशी 151 शाळांमध्ये 14 हजार 778 विद्यार्थी यांची उपस्थिती नोंदवली गेली.

करोनामुळे बंद (Covid 19 Close) असणार्‍या शाळा गेल्या वर्षी नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये करोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने शाळा सुरु करण्यात आल्या होत्या. करोनाचा वाढता प्रादुर्भाव यामुळे गेल्या वर्षभरापासून प्रत्यक्षपणे शाळा भरलेली नाही. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होवू नये. यासाठी ऑनलाइन वर्ग (Online Class) घेण्यात येत आहेत. परंतु शाळा बंद असल्याने होणारे परिणाम पाहता. जी गावे करोनामुक्त (Covid 19 Villages Free) आहेत. अथवा जिथे मागील तीस दिवसात एकही करोना बाधित आढळून आलेला नाही. अशा गावातील आठवी ते बारावीचे वर्ग सुरु करण्याचा निर्णय शासनाने जाहीर केला होता.

त्यानुसार कोविड 19 चे सर्व नियम पाळत दोन दिवसांपासून शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. यात जिल्ह्यात सर्व व्यवस्थापनाच्या 1 हजार 210 आठवी ते बारावीच्या शाळा आहेत. यातील 135 खासगी व्यवस्थापनाच्या तर 15 या जिल्हा परिषदेच्या अशा 151 शाळांमध्ये शुक्रवारी आठवी ते बारावीचे वर्ग भरले. जिल्ह्यात आठवी ते बारावी पर्यंत विद्यार्थ्यांचा 37 हजार 923 विद्यार्थ्यांचा पट आहे. यापैकी शुक्रवारी 14 हजार 778 विद्यार्थी काल शाळेत हजर होते.

सुरू झालेल्या शाळा आणि कंसात विद्यार्थी

अकोले 46 (7 हजार 180), संगमनेर 22 (2 हजार 518), कोपरगाव 4 (82), राहाता 24 (1 हजार 665), राहुरी 6 (617), श्रीरामपूर 3 (214), नेवासा 14 (1 हजार 189), शेवगाव 4 (164), पाथर्डी 11 (198), कर्जत 1(80), जामखेड 1, श्रीगोंदा 4 (352), पारनेर 2 (32) नगर 7 (874) अशा 151 शाळांमध्ये 14 हजार 778 विद्यार्थी.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com